Nashik Fraud Crime : शेअर्स गुंतवणुकीतून आणखी एकाला गंडा; 2 कोटींची फसवणूक

Fraud Crime : शेअर्स मार्केटमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला तब्बल दोन कोटी १३ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : शेअर्स मार्केटमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला तब्बल दोन कोटी १३ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्याभरात अशारीतीने फसवणूक झाल्याची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime person was cheated marathi news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका ५० वर्षीय व्यक्तीला संशयित समीर उपाध्याय, अभिवन मिश्रा, अभिषेक शर्मा, तिलक जोशी, आदित्य रस्तोगी यांसह दोन बँक खातेधारकांविरुद्ध सायबर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांनी काही महिन्यांपूर्वी डिमॅट खाते सुरू केले होते.

त्यांना शेअर्स मार्केटमधील गुंतवणुकीचा अनुभव नसल्याने त्यांनी याबाबत ऑनलाइन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संशयितांनी फिर्यादी यांना मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देताना शेअर मार्केटमधून जादा परतावा पाहिजे असल्यास चांगली गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. (latest marathi news)

crime
Nashik Fraud Crime : आणखी एकाला 5 लाखांना घातला गंडा; नकली सोने विक्री प्रकरण

फिर्यादीने ऑनलाइन संपर्कात आलेल्या एका कंपनीमार्फत शेअर्समध्ये २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यामध्ये त्यांना आर्थिक परतावा मिळाला नाही. त्या वेळी संशयिताने त्यांना १२ लाखांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चार-पाच दिवसांत पाच कोटींचा जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

तसेच मोबदल्यात ८९ हजार रुपये ‘कमिशन’ही मिळेल, असेही संशयिताने त्यांना आमिष दाखविले. या आमिषाला भुलून फिर्यादीने सुरवातीला दोन लाख रुपये दिले. त्यावर संशयितांनी अडीच कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा केला. त्यानंतर फिर्यादीने टप्प्याटप्प्याने दोन कोटी गुंतविले.

परंतु त्यावर दिसणारी जादा परताव्याचे पैसे परत मागितल्यावर संशयितांनी टाळाटाळ केली. वर्षभरानंतरही पैसे अथवा परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव फिर्यादीला झाली. त्यामुळे त्यांनी नाशिक सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Fraud Crime : बनावट डिमांड ड्राफ्ट बनवून ॲक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.