Nashik Fraud Crime : पिंपळगावच्या द्राक्ष व्यापाऱ्याला दीड कोटीचा गंडा

Fraud Crime : द्राक्षाला यंदा हंगामाच्या शेवटी समाधानकारक भाव मिळाला असला तरी शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
 Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : द्राक्षाला यंदा हंगामाच्या शेवटी समाधानकारक भाव मिळाला असला तरी शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. द्राक्ष व्यापारी व त्यांच्या पायलटने संगमताने केलेल्या फसवणुकीत आतापर्यंत परिसरातील ४७ शेतकऱ्यांना एक कोटी ५२ लाख ५६ हजार ३९६ रुपयांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात त्या पाच ठकबाजांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Pimpalgaon grape trader cheated of 1 crore )

आकर्षक बाजारभावामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामाचा शेवट गोड झाला होता. पण व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ‘चुना’ लावण्याचे प्रकार पुढे येत आहेत. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने अनोळखी व्यापाऱ्यांशी सौदे करून शेतकरी पायावर धोंडा मारून घेतल्याने फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक श्याम विधाते (रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या द्राक्षमालाचा भोले व्हेजिटेबल कंपनीचे नरेंद्र जाधव (रा. सोनजांब, ता. दिंडोरी), उमेश गौतम उर्फ रामकुमार (रा. मंडोली, हिमाचल प्रदेश), विशाल नकंदवारा (रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), बाळासाहेब ऊर्फ पप्पू आहेर (वडाळीभोई, ता. चांदवड), हृषीकेश जाधव (रा. सोनजांब, ता. दिंडोरी) यांनी तीन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने सौदा केला. विश्‍वास संपादन करण्यासाठी ५० हजार रुपये रोख दिले.

 Fraud Crime
Nashik Fraud Crime : कॉम्प्युटर ॲक्सेसरीज विक्रेत्याने घातला 48 लाखांना गंडा; 18 दुकानदारांची केली फसवणूक

धनादेश वटलेच नाहीत

विधाते यांच्या ८८ क्विंटल द्राक्षाची काढणी नरेंद्र जाधव व त्याच्या साथीदारांनी केली. त्यांच्या द्राक्षापोटी दोन लाख ७५ हजार २४५ रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश श्‍याम विधाते यांना दिला. त्याबरोबर परिसरातील ४७ शेतकऱ्यांचे द्राक्ष काढणी करून त्यांना बँकेचे धनादेश दिले. शेतकऱ्यांनी ते धनादेश खात्यात जमा केले.

पण नरेंद्र जाधव याच्या ‘भोले व्हेजिटेबल’ कंपनीच्या खात्यात रक्कमच नसल्याने धनादेश वटले नाहीत. एकूण एक कोटी ५२ लाख ५६ हजार ३९६ रुपये व्यापाऱ्यांकडे लटकले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्‍याम विधाते व ४७ शेतकऱ्यांनी भोले व्हेजिटेबलच्या ठकबाज टोळीवर पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहे.

 Fraud Crime
Nashik Fraud Crime : अबब... तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक! विश्वास संपादन करून घातला गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.