Nashik Fraud Crime : स्क्रॅप प्रकरणी संगईंच्या कंपनीतील दोघे अटकेत; वजनकाट्यातील 3 जण ताब्यात

Fraud Crime : व्यावसायिकाने ट्रकच्या वजनामध्ये तसेच काटा पावतीमध्ये फेरफार करून कंपनी मालकाची लाखोंची रुपयांची फसवणूक केली होती.
Maharashtra weigh scale.
Maharashtra weigh scale.esakal
Updated on

Nashik Fraud Crime : कंपनी मालकाचा विश्वास संपादन करून एका स्क्रॅप मटेरिअल विकत घेणाऱ्या व्यावसायिकाने ट्रकच्या वजनामध्ये तसेच काटा पावतीमध्ये फेरफार करून कंपनी मालकाची लाखोंची रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अभिषेक शर्मा या स्क्रॅप विक्रेत्यावर अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपास सुरू असताना पोलिसांनी शर्मा याला मदत करणाऱ्या कंपनीतील अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. (Two of Sangai company arrested in scrap case 3 people of weight loss are detained )

जितेंद्र हिराराम मिश्रा (४८ रा. पाथर्डी फाटा,) तसेच गोपाल सुरेश राणे ( ४२ अंबिकानगर, कामटवाडे) असे संशयितांची नावे आहेत. अटक केलेले दोघेही फिर्यादी संगई यांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत असल्याचे समजते. स्क्रॅप विकत घेणाऱ्या शर्मा याला ट्रकचा वजनकाटा करताना वजनात फेरफार करताना साथ देऊन आमिषापोटी फिर्यादी यांची देखील फसवणूक करत होते. त्यामुळे अंबड पोलिसांनी सोमवारी (ता.२२) सकाळी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra weigh scale.
Nashik Fraud Crime : घरविक्रीचे पैसे घेऊन ताबा न देता केली फसवणूक

सोमवारी दुपारनंतर या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवार (ता.२४) पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या चौकशीत अंतिम वजन काट्यांमध्ये तसेच वजन पावत्यांमध्ये फेरफार करणाऱ्या तिघा वजन काट्यांवरील ऑपरेटर्सला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे अजूनही उद्योजकांची फसवणूक करणारे स्क्रॅप व्यावसायिक समोर येण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Maharashtra weigh scale.
Nashik Fraud Crime : रेल्वेतील नियुक्तीचे दिले बनावट पत्र; 4 बेरोजगारांची 19 लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.