Nashik Crime News : बोलोरो पिकअप परराज्यातील असताना संशयित चालकाने तिला बनावट नंबरप्लेट लावून वापरली. तसेच, स्वत:च्या नावावर ते वाहन केल्याचे आढळून आल्याने संशयित चालकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime use of pickup using fake number plates marathi news)
अक्षय शंकर लामखेडे असे संशयित चालकाचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक म्हसरुळ परिसरात गस्तीवर असताना अंमलदार सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे यांना, बोलोरो पिकअप वाहन बनावट क्रमांक लावून वापरात असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार युनिट एकच्या पथकाने म्हसरुळ येथील कन्सारा माता चौकातील पुष्कराज अपार्टमेंट येथे सदरील बोलोरो पिकअप (एमएच १५ एचएच ४९९८) आढळून आले. पथकाने पिकअपच्या मूळ चेसीस व इंजिन क्रमांकावरून माहिती घेतली असता, या पिकअप वाहनाचा क्रमांक टीएन २२ डीए ५०१४ असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, ते वाहन संशयित अक्षय शंकर लामखेडे याने त्याच्या नावावर केल्याचे आढळून आले. (latest marathi news)
संशयिताने बनावट क्रमांक लावून पिकअप वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयिताला अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, समाधान पवार यांनी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.