Nashik Fraud Crime: व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचा वापर करून गंडा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांनीच केली 93 लाखांची फसवणूक

Fraud Crime News : विमान तिकीट काढण्यासाठी परकीय कंपनी चार तासांसाठी एक व्हर्च्युअल क्रेडीट कार्ड या कंपनीला देत असे. या कार्डचा वापर करण्याचा अधिकार या तिघा संशयितांना असल्याने ते विमान तिकीटे काढत.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : ऑनलाईन विमानाचे तिकिट काढून देण्याचे काम करणाऱ्या आयटी कंपनीतील उच्चशिक्षित तिघा संशयितांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि, व्हर्च्युअल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ९३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (using virtual credit cards 93 lakhs fraud committed by employees of IT company)

मयुर वाडेकर, आदिल शेख, भुषण वाघोदकर अशी फसवणूक करणार्या संशयितांची नावे आहेत. ‘डब्ल्यूएनएस’ या आयटी कंपनीचे प्रतिनिधी कुमार परमसिवन नाडर (४२, रा. सराफनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, डब्ल्यूएनएस या आयटी कंपनीत तिघे उच्चशिक्षित संशयित नोकरीला होते.

त्यांना परकीय कंपनीमार्फत विमान तिकीटे काढण्याचा, रद्द करण्याचा अधिकार होता. विमान तिकीट काढण्यासाठी परकीय कंपनी चार तासांसाठी एक व्हर्च्युअल क्रेडीट कार्ड या कंपनीला देत असे. या कार्डचा वापर करण्याचा अधिकार या तिघा संशयिताना असल्याने ते विमान तिकीटे काढत. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Crime: दुचाकीस्वारास मारहाण करून रोकड लुटणारी टोळी जेरबंद; MIDC पोलिसांची कामगिरी; चोरीची साडेसात लाख रुपये रक्कम हस्तगत

तिघांनाही युजर आयडीसह कार्ड ईश्युचा अधिकार होता. मात्र, संशयितांनी त्याचा गैरवापर करीत परकीय कंपनीकडून २२९ व्हर्च्युअल क्रेडीट कार्ड काढले. त्यापैकी ११५ कार्डवरून विमान तिकीटे काढून सुमारे ९३ लाखांचा गैरव्यवहार केला. गेल्या १३ जुलै ते ४ ऑगस्ट या सदरचा प्रकार घडला आहे. सदरचा प्रकार उघडकीस येताच, याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

एका कार्डवर १ लाख

परकीय कंपन्यांकडून व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड चार तासांसाठी सुरु केले जाते आणि त्यावर परकीय कंपनी १ लाख रुपये टाकते असते. संशयित तिघांनी संगनमत करून त्यांच्या आयडीसह इतर कर्मचाऱ्यांच्या आयडीचा वापर केला आहे. त्यानुसार तिघांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : सबसिडीत ट्रॕक्टर घेऊन देण्याचे अमिष दाखवुन 91 हजार 500 रुपयांची फसवणुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.