Nashik Fraud Crime : मनमाडच्या युनियन बँकेत ‘इन्शुरन्स’ घोटाळा; बनावट सर्टिफिकेट देऊन लाखो रुपयांची फसवणूक

Fraud Crime : हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने ग्राहकांचे धाबेच दणाणले आहे.
Fake Documents
Fake Documents esakal
Updated on

Nashik Fraud Crime : येथील युनियन बँक शाखेत कोट्यवधी रुपयांचा ‘एफडी घोटाळा’ उघडकीस येतो ना येतो तोच आता पुन्हा याच बँकेत बँकेची सिस्टर कन्सर्न असलेल्या स्टार युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने ग्राहकांचे धाबेच दणाणले आहे. विशेष म्हणजे एफडी घोटाळ्यातील संशयित आरोपी संदीप देशमुख याचाच या इन्शुरन्स घोटाळ्यात सहभाग आहे. ( Fraud of lakhs of rupees by giving fake certificates in union bank )

सुमारे ७६ लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीने त्याच्याविरोधात मनमाड पोलिसात फिर्याद दिली असून, विमा ग्राहकांत एकच खळबळ उडाली आहे. येथील युनियन बँक शाखा पुन्हा घोटाळ्याने चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी या बँक शाखेत एफडी घोटाळा उघडकीस आला होता. याच बँकेत विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या संदीप देशमुख याने ठेवीदारांची फसवणूक करून बँकेच्या नावाने खोटे कागदपत्रे, शिक्के, लेटरहेड बनवून ठेवी ग्राहकांना नकली ठेवी प्रमाणपत्र देत त्यांची फसवणूक केली.

सदर प्रकार उघडकीस आल्याने ठेवीदार ग्राहकांचे धाबे दणाणले होते. याबाबत अनेक ठेवीदारांनी तसेच आमदार सुहास कांदे यांनी सदर विमा कर्मचारी संदीप देशमुख आणि बँकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध मनमाड पोलिसात तक्रार दाखल केली होती. संदीप देशमुख हा अटकेत असून, १४ दिवसांची पोलिस कोठडी भोगून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Fake Documents
Nashik Fraud Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धेची फसवणूक!

त्यामुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने या प्रकरणामुळे ग्राहकांच्या मनात बँकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एफडी घोटाळ्याचा प्रकार राज्यात गाजत असतांनाच नव्या घोटाळ्याने विमा ग्राहकांची झोप उडवली आहे. याच बँकेत एफडी घोटाळा करणारा संदीप देशमुख हाच या घोटाळ्याचा सूत्रधार निघाला असल्याने मनमाडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बँकेत बसूनच सुरु होता गैरव्यवहार

मुळात युनियन बँकेशी संलग्न ही विमा कंपनी असल्याने संशयित संदीप देशमुख याने परिसरातील जवळपास १८ विमा धारकांची विमा पॉलिसी काढून विम्याची ७६ लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे जमा केली नसल्याचा आरोप विमा कंपनी प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार संदीप देशमुख हा बँकेच्या कार्यालयात बसून करीत होता. या गंभीर प्रकरणाबाबत शनिवारी रात्री विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी एफडी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप देशमुख याच्याविरोधात तक्रार दिली आहे.

Fake Documents
Nashik Fraud Crime : प्‍लॉट डेव्‍हलपमेंटच्‍या नावाने, नंतर खोट्या कर्जातून फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.