Nashik Fraud Crime : भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची फसवणूक

Nashik News : भक्त परिवारातून ओळख झालेल्या सोलापूरच्या संशयितांनी नाशिकच्या महिलेस सोनारांच्या भिशीत गुंतवणूकीस भाग पाडून गंडा घातला.
Fraud Crime
Fraud Crime esakal
Updated on

Nashik News : भक्त परिवारातून ओळख झालेल्या सोलापूरच्या संशयितांनी नाशिकच्या महिलेस सोनारांच्या भिशीत गुंतवणूकीस भाग पाडून गंडा घातला. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार आणि महिलेच्या नावावरील फ्लॅटच्या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून कर्ज काढले. अशारितीने संशयितांनी सुमारे ७६ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of woman by forcing her to invest in Bhishi)

प्रशांत रवींद्र पोतदार (रा. अंदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), रेणुका रवींद्र पोतदार, रवींद्र पोतदार अशी संशयितांची नावे आहेत. रुपाली धीरज पंडित (रा. आकांक्षा पार्क, पवार लॉन्स, मखमलाबाद शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गाणगापूर येथील श्री दत्त संप्रदायाच्या भक्त आहेत. २०१७ मध्ये त्यांची ओळख या भक्त परिवारातील संशयित प्रशांत पोतदार यांच्याशी झाली होती.

एकाच भक्त परिवारातील असल्याने त्यांची चांगली ओळख निर्माण झाली. त्याच ओळखीतून संशयितांनी रुपाली यांना सोलापूरमध्ये त्यांच्या सोनारांची भिशीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यातून चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो असेही आमिष दाखविले होते. त्यामुळे रुपाली यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली. (latest marathi news)

Fraud Crime
Nagpur Crime News : मैत्रिणीशी बोलल्याने वर्गमित्रावर हल्ला; तरुणीसह दहा जणांवर गुन्हा दाखल

परंतु संशयितांनी ठरल्यप्रमाणे, त्यांना कोणताही मोबदला दिला नाही, व भिशीची रक्कमही दिली नाही. तसेच, पोतदार यांच्यावर विश्वास ठेवून रुपाली यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने शुद्ध करण्यासाठी दिले होते. परंतु संशयितांनी ते दागिनेही परत न करता त्या दागिन्यांचे अपहार केला.

त्याचप्रमाणे, रुपाली यांच्या नाशिकमधील फ्लॅटवरील कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून त्यावर कर्ज काढले. सदरची रक्कम वापरून घेत ती परत न करता फसवणूक केली. अशा तिन्ही प्रकारात संशयिताने त्यांची ७६ हजार ४७ लाख ६२० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयितां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे करीत आहेत.

Fraud Crime
Crime News: मालाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.