Nashik Fraud Crime : प्‍लॉट डेव्‍हलपमेंटच्‍या नावाने, नंतर खोट्या कर्जातून फसवणूक

Nashik News : प्‍लॉट विकसित करण्याच्‍या बहाण्याने एकाची सुमारे ऐंशी लाखांची फसवणूक करण्यात आली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : प्‍लॉट विकसित करण्याच्‍या बहाण्याने एकाची सुमारे ऐंशी लाखांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्‍हणजे संशयिताचे ही रक्‍कम परत फेड करताना ती कर्जस्‍वरुपात दिल्‍याचे भासवून तक्रारदाराकडून पैशांच्या वसुलीसाठी तकादा लावत दमदाटी केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. (One defrauded of about eighty lakhs on pretext of developing plot)

आणखी धक्‍कादायक बाब म्‍हणजे परिचित व्‍यक्‍तीकडूनच हे गैरकृत्‍य करण्यात आले. याप्रकरणी नासीर हमीद शेख (रा.सारडा सर्कल) यांनी संशयित अब्‍दुल कादीर अहमद शेख (रा. वडाळागाव) याच्‍या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी नासीर शेख व संशयित हे दोघे एकमेकांच्‍या ओळखीचे आहेत.

श्री. शेख यांचा विश्‍वास संपादन करताना संशयिताने प्‍लॉट विकसीत करण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. २०१३ पासून आजवर अशा अकरा वर्षांच्‍या कालावधीत एकूण ८० लाख रुपये उकळले. (latest marathi news)

Fraud Crime
Dhule Fraud Crime : माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीद्वारे ठेवीदाराची फसवणूक; 6 जणांविरुद्ध गुन्हा

इतक्‍यावरच न थांबता त्‍याने हे पैसे परत दिले खरे. परंतु फिर्यादी शेख यांना गाळा घेण्यासाठी हे पैसे कर्ज स्‍वरुपात दिल्‍याचे भासवीत, याबाबत खोटे सामंजस्‍य करार केल्‍याचा दावा फिर्यादीत केला आहे.

यानंतर पैशांसाठी तगादा लावताना, खोटे गुन्‍हे दाखल करण्यासाठी दम देत फसवणूक केल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : व्यवस्थापक असल्याचे भासवून भंगार खरेदीदारास 25 लाखांचा गंडा; वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.