Nashik News: नाशिक जिल्ह्यात पावणे दोन लाख महिलांना मोफत साडी! अंत्योदय रेशनकार्ड धारकांना मिळणार लाभ

Nashik News : जिल्ह्यातील अंत्योदय रेशनकार्ड धारकांना मोफत साडी वाटपासाठी जिल्ह्यात एक लाख ७६ हजार साड्या दाखल झाल्या आहेत
Sarees
Sareesesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील अंत्योदय रेशनकार्ड धारकांना मोफत साडी वाटपासाठी जिल्ह्यात एक लाख ७६ हजार साड्या दाखल झाल्या आहेत. दोन हजार ६०९ रेशन दुकानांमधून या साड्यांचे वाटप होणार आहे. लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगाच्या या साड्या उपलब्ध असताना एकाच रंगाच्या साड्यांची मागणी होत असल्याने रेशन दुकानदारांचे ‘टेन्शन’ वाढले आहे. (Nashik Free sarees for Antyodaya ration card holders women marathi news)

राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारकांना वर्षातून एकदा मोफत साडी दिली जात आहे. आतापर्यंत ६० हजार ५१५ कुटुंबांना साडी उपलब्ध करून दिली. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आचारसंहितेत साडी वाटप अडकणार आहे.

त्यामुळे साड्या उपलब्ध झाल्यानंतर तातडीने त्या लाभार्थी कुटुंबांना वितरित कराव्यात, अशा सूचना पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. परंतु, साड्या घेण्यासाठी दुकानात येणाऱ्या लाभार्थी विशेषत: महिला वर्गाकडून साड्यांच्या रंगासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे मोफत साडी वितरण हे दुकानदारांसाठी अडचणीचे ठरते आहे. (Latest Marathi News)

Sarees
BJP News : भाजपचा नाशिकसाठी सुप्त 'अंडर करंट'; संघातील वरिष्ठांचा आग्रह, पुढील निर्णयाची स्थानिक भाजपला प्रतीक्षा

तालुकानिहाय उपलब्ध साड्या

बागलाण :१३११६

चांदवड : ६२२७

देवळा : ५०९१

दिंडोरी :१३१४४

मालेगाव शहर : १६६०६

नाशिक शहर : १०५९१४

इगतपुरी : १०६८८

कळवण : ८६५१

मालेगाव : ११२३५

नांदगाव : ५२७१

मनमाड : ३३०५

नाशिक : ८६२७

निफाड : १०८३१

पेठ :१०८४२

सिन्नर : ८०६५

सुरगाणा : १५३२७

त्र्यंबकेश्वर : ८८८४

येवला : १००५१

"अंत्योदय रेशनकार्ड धारकांनाच ही योजना असली तरी प्राधान्य रेशनकार्ड धारकही साडीचा आग्रह धरतात. शासनाने सरसकट प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना साड्यांचे वितरण करून रेशन दुकानदारांना दिलासा द्यावा."

-निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना

Sarees
Nashik Weather Update: वातावरणात पुन्‍हा गारवा, साथीच्‍या आजारांत वाढ! राज्‍यात नाशिकचे किमान तापमान नीचांकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.