Kadwa Sugar Factory : ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात FRP जमा! ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांची माहिती

Latest Nashik News : अनेक कारखाने एफआरपी देऊ शकले नाहीत. मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे.
shriram shete
shriram sheteesakal
Updated on

दिंडोरी : तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मधील एफआरपी पोटी अंतिम ऊसबिल ६४.२० रुपयाप्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करत २७६४.२० रुपयांप्रमाणे संपूर्ण एफआरपी अदा केल्याची माहिती कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. (FRP deposited in bank account of sugarcane producers Kadwa sugar factory)

कादवा कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ३२९५ ८२ टन उसाचे गाळप करत १२.२२ टक्के साखर उतारा मिळवत ४००१०० क्विंटल साखर निर्मिती केली. इथेनॉल निर्मीतीला पेसो परवाना प्राप्त झाल्याने ३.६४ लाख इथेनॉल व ३६.७४ लाख लिटर स्पिरीट निर्मिती झाली.

या हंगामात कमी ऊस उपलब्धतेमुळे कमी गाळप झाल्याने साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊस बिल अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. अनेक कारखाने एफआरपी देऊ शकले नाहीत. मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे.

कादवाने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून, कार्यक्षेत्रामध्ये ३४२४ हेक्टर, पेठ सुरगाणा ३४५ हेक्टर ऊसलागवड नोंद झाली असून, गेटकेनमधून २९७३ हेक्टर ऊसलागवड नोंद झाली आहे. अशी एकूण ६७४३ हेक्टर ऊस लागवडीची नोंद झाली आहे.

तसेच कार्यक्षेत्र व गेटकेनमधून अजूनही नोंदी सुरू आहे. पुरेशा प्रमाणात ऊसतोड कामगार भरती करण्यात आली आहे. ऊसलागवड वाढण्यासाठी कारखान्याकडून विविध ऊस विकास योजना राबविल्या जात आहेत. ऊस उत्पादकांना उधारीत कंपोस्ट खत तसेच रासायनिक खते उपलब्ध करून दिले आहे. (latest marathi news)

shriram shete
Nashik Water Supply : पाणीपुरवठ्याची समस्या निघणार निकाली! चारशे किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या

ठिबक सिंचनाद्वारे ऊसलागवड करावी

यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर करत ऊस लागवड करावी. त्यासाठी कारखान्याकडून सहकार्य केले जाईल. शासनाने शेअर्सची रक्कम रु.१०,०००/- वरुन रु.१५,०००/- केली आहे. ज्यांचे शेअर्स दहा हजार आहेत, त्यांना २५ किलो, तर ज्यांचे शेअर्स पूर्ण होईल. त्यांना ५० किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. शेअर्सची वाढीव रक्कम भरण्यास सहकार्य करावे, जास्तीत जास्त ऊस लागवड करून कादवास ऊसपुरवठा करावा.

सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबरला

तसेच ५३ व्या अधिमंडळाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २७) दुपारी दोनला होत असून, सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

shriram shete
Nashik Silk Industry: जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांचा रेशीम उद्योग! कोचरगावच्या हिरकणी बचत गटाच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला फाटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.