Nashik News : घोटीला होणार उप जिल्हा रुग्णालय; 85 कोटीचा निधी मंजूर

Nashik : घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे ८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
Fund
Fund esakal
Updated on

Nashik News : घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे ८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे ही या भागातील नागरिकांची जुनी आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. घोटी परिसरातील खेडोपाडी वाडी-वस्‍त्यावर राहणाऱ्या कुटुंबाची संख्या मोठी आहे. उपचार करण्यासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात खेड्यापाड्यातून लोक येतात. (Nashik Fund of 85 crore approved for Sub District Hospital in Ghoti )

मात्र येथे सध्या पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. अनेक गोरगरिबांना नाशिकला जाण्याइतकेही पैसे नसतात. ही या भागातील अडचण आहे. घोटी ही इगतपुरी तालुक्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. तालुक्यातील पंचक्रोशीतील सुमारे १०० ते १५० लहान मोठे खेडी पाडी वाड्यावस्त्या या गावाला जोडलेल्या आहेत. दैनंदिन कामासह शिक्षण, वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी लोक घोटीला येतात. (latest marathi news)

Fund
Nashik News : बॉश कंपनीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

आता घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने तसेच ८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. कामाला कधी सुरवात होणार आहे याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. सध्या ३० बेडचे हॉस्पिटल आता १०० बेडचे होणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना नाशिकला जावे लागणार नाही. घोटी येथेच वैद्यकीय सुविधा उलब्ध होणार आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी २०२१ ला तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता.

''मागील कित्येक वर्षे घोटी व परिसरातून जनतेची मागणी होती घोटी हे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे परंतु शासन दरबारी अडचनी येत. मात्र आता तालुक्यातील जनतेची मागणी पूर्ण होण्याने आरोग्याचा प्रश्न मिटेल.''- बाळासाहेब वालझाडे (सामाजिक कार्यकर्ते )

Fund
Nashik News : नद्यांवरील पूररेषेची फेरआखणी होणार; जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.