Nashik News : महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत लाकडावरील दहन विधी अंत्यसंस्कार करण्याकडे नागरिकांचा अधिक कल आहे. त्या तुलनेत मोफत व प्रदूषण न होणाऱ्या विद्युतदाहिनीच्या माध्यमातून विधी होत नाहीत. मागील दोन वर्षाचा विचार करता लाकडावरील अंत्यसंस्कारापेक्षा विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण अवघे पंधरा टक्के दिसून येत आहे. (Funerals on Vidyut Dahini are not accepted for citizens )
विद्युत दाहीनीवरील अंत्यसंस्कार मोफत व अप्रदूषणकारी असतानाही विद्युतदाहिनीला न मिळणारा प्रतिसादामागे हिंदू धर्मशास्रातील कारण सांगितले जात आहे. महापालिकेकडून २००२ पासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत आठ मन लाकूड, पाच गौरी व दोन लिटर रॉकेल पुरविले जाते. मागील २२ वर्षांपासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविताना विभागनिहाय योजनेचा विस्तारदेखील करण्यात आला.
हिंदू सोबतच मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांसाठीदेखील योजना अमलात आणली गेली. पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून सप्टेंबर २०१८ पासून विद्युतदाहिनी सुरू करण्यात आली. हिंदू धर्मीयांमध्ये लाकडावरील दहनविधीला महत्त्व आहे. त्यामुळे विद्युतदाहिनीचा पर्याय टाळून लाकडावरील दहनविधीला अद्यापही प्राधान्य दिले जाते. २०२१ व २०२२ मध्ये विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले.
परंतु त्यामागे कोरोनाकाळात मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे महत्त्वाचे कारण आहे. सद्यःस्थितीत नाशिक अमरधाममधील विद्युतदाहिनी सुरू आहे. येथे दोन बेड आहेत. सिडको विभागातील त्रिमूर्ती चौकात दोन, तर नाशिक रोड विभागातील दसक व पंचक स्मशानभूमीत दोन अशा चार विद्युतदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पंचवटी अमरधाममध्ये सध्या काम सुरू आहे. (latest marathi news)
विद्युतदाहिनीचा खर्च कमी, लाकडाचा अधिक
लाकडावर अंत्यविधी करण्यासाठी ३४० किलो लाकूड खर्ची होते. महापालिका मोफत अंत्यसंस्कारासाठी ३५०० ते ४००० रुपये खर्च करते. गॅस दाहिनीवर विधी करण्यासाठी १८ ते २० किलो गॅस खर्ची पडतो. व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८०० ते २००० रुपये आहे. विद्युत दाहिनी सुरु केल्यानंतर ६०० डिग्री सेल्सिअसला स्वीच होते. त्यानंतर पुन्हा त्याचे तापमानाला पुन्हा सुरु होते. या दरम्यान एकापाठोपाठ एक मृतदेहांवर संस्कार केल्यास जवळपास पंधरा युनिट वीजेचा वापर होतो. करांसहित साधारण दोनशे रुपये खर्च होतात.
सद्यःस्थितीत फारसा प्रतिसाद मिळतं नसला तरी विद्युतदाहिनीचे प्रमाण वाढविले जात आहे. जुन्या पिढीतील नागरिकांना अद्यापही विद्युतदाहिनीवरील अंत्यसंस्कार मान्य नाही. परंतु नवीन पिढीमध्ये निसर्गाबद्दल जागृती वाढत आहे. मुंबई, पुण्यात विद्युतदाहिनीला चांगला प्रतिसाद आहे. नाशिकमध्येही भविष्यात विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण वाढणार आहे. डॉ. आवेश पलोड, आरोग्य विभाग, महापालिका. महापालिका प्रशासनाचा आहे.
''हिंदू धर्मशास्रानुसार पूर्वी वाळलेली कास्ट (लाकूड) व वाळलेले तृण (गवत) यात दहन होत असे त्यानंतर लाकडावर दहन सुरु झाले. पृथ्वी, तेज, अग्नी, वायु, जल पंचत्वात विलीन होण्यासाठी दहन विधी करतात. अग्निसंस्कार हा निसर्गपूरक आहे. याने कुठलीही हानी होत नाही. अग्निसंस्कार झाल्यानंतर रक्षा तयार होते. ती रक्षा गोदावरी किंवा अन्य तीर्थांमध्ये विसर्जित केली जाते.''- चंद्रशेखर पंचाक्षरी, कार्याध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक.
लाकडावरील अंत्यसंस्कार वर्ष अंत्यसंस्कार
२०२३ ७२४२
२०२४ (३१ जुलै पर्यंत) ३८४७
विद्युतदाहिनीवरील अंत्यसंस्कार वर्ष अंत्यसंस्कार
२०१८ २५२
२०१९ ५८६
२०२० १८१५
२०२१ १७४२
२०२२ ८३२
२०२३ ७०६
२०२४ २८६
एकूण ६२१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.