Nashik NMC : पावसाळापूर्व कामांचा फोलपणा उघड! प्रत्यक्षात 60, दाखविले 80 टक्के; 100 टक्के बिले काढली

Nashik News : महापालिकेकडून मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा फोलपणा महापालिकेच्या एका अहवालातून उघड पडला आहे.
Vehicles passing through rain water on the road.
Vehicles passing through rain water on the road.esakal
Updated on

Nashik News : महापालिकेकडून मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा फोलपणा महापालिकेच्या एका अहवालातून उघड पडला आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत ६० टक्के कामे झाली असताना जिल्हाधिकारी कार्यालयात ८० टक्के कामे झाल्याचे दाखविले गेले. विशेष म्हणजे १०० टक्के बिले काढली गेली. (futility of pre monsoon work being carried out by municipal corporation revealed in report of municipal corporation)

पहिल्या एक, दोन पावसात शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने पावसाळापूर्व कामांचा ‘ऑंखो देखा हाल’ नाशिककरांनी बघितला. त्यात आता अहवालातून वास्तव समोर आल्याने येत्या अधिवेशनात पावसाळापूर्व कामांचा लेखाजोखा लोकप्रतिनिधींकडून मांडला जाणार आहे. पावसाळ्यात नाले, गटारी, चेंबर साफ करण्याचे कामे केली जातात.

त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद असते. या वर्षीदेखील पावसाळापूर्व कामे करण्यात आली. कामे करताना त्यातील फोलपणा मागील आठवड्यात झालेल्या पावसावरून समोर आला. जागोजागी पाणी साचले. नाल्यांमधून पावसाचे पाणी रस्त्यावर आले. सखल भागातही रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून चालण्याची कसरत नाशिककरांना करावी लागली.

पहिल्या पावसात सिडको, पंचवटी विभागातील म्हसरुळ या भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे वास्तव समोर आले. चारचाकी वाहने पाण्याखाली गेली. घरांमध्ये पाणी शिरले. पावसाळापूर्व कामे केली असती तर जागोजागी पाणी का साचले, याचे उत्तर महापालिकेच्याच अहवालातून समोर येत आहे. प्रत्यक्षात शंभर टक्के पावसाळापूर्व कामेच झाली नसल्याचे समोर आले आहे. (latest marathi news)

Vehicles passing through rain water on the road.
Nashik NMC : निवडणुका संपताच महापालिकेचा ॲक्शन मोड; सिंहस्थ कामांची आयुक्तांकडून पाहणी

बारा हजार मीटर नाल्यांची सफाई अपूर्ण

शहरात सहा विभागात एकूण पावसाळी नाल्यांची लांबी १ लाख २१ हजार ६६६ मीटर आहे. यातील ४४ हजार ७८७ मीटर नाले साफ करायची असतात. यापैकी १२ हजार ६३१ मीटर नाल्यांची सफाईच झाली नसल्याची बाब अहवालात मांडण्यात आली आहे. पावसाळा गटारींच्या चेंबरची संख्या १० हजार ४४६ आहे, त्यापैकी ३५०० चेंबरची सफाईच झाली नाही.

९० हजार ३३१ मीटर खुल्या गटारी आहेत. त्यातील ४६ हजार ९६७ मीटर खुल्या गटारींची दरवर्षी स्वच्छता केली जाते. परंतु ३५ हजार ५२८ मीटर गटारींची स्वच्छता झाली तर ११ हजार ४३९ मीटर खुल्या गटारींची सफाई झाली नाही.

अधिवेशनात मुद्दा

पावसाळापूर्व कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. तेथे ८० टक्के पावसाळापूर्व कामे झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात साठ टक्के इतकीच कामे झाली आहेत. स्वच्छतेवर जवळपास २८ कोटींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते. चाळीस टक्के सफाईची कामे झाली नसताना नेमका खर्च केला कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्याअनुषंगाने येत्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Vehicles passing through rain water on the road.
Nashik NMC News : अपघातमुक्त शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा; उपाययोजना सुचवून नियमावली

विभागनिहाय पावसाळापूर्व न झालेली कामे (मीटरमध्ये)

विभाग पावसाळी नाले चेंबर (नग) खुल्या गटारी

पूर्व ५२० ८०० १८१५

पश्‍चिम ९० २५९ ६५

पंचवटी ६८१ ७४ ५०५

नाशिक रोड ४,३२५ १०२ १८९३

सिडको ५,७५९ १६९० ६०६९

सातपूर १,२५६ ५७५ १०९२

------------------------------------

एकूण १२,६३१ ३,५०० ११,४३९

Vehicles passing through rain water on the road.
Nashik NMC : ‘सी ॲन्ड डी’ वेस्ट प्रकल्प निधीअभावी लांबणीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com