Nashik Ganesh Visarjan Miravnuk : टेकवितो माथा तुज चरणी बाप्पा मोरया! 12 तास थिरकले गणेशभक्त

Ganesh Visarjan Miravnuk : लाडक्‍या बाप्पाला निरोप देत मंगळवारी (ता. १७) पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुक पार पडली.
Nashik drummer practicing playing.
Nashik drummer practicing playing.esakal
Updated on

नाशिक, जुने नाशिक : लाडक्‍या बाप्पाला निरोप देत मंगळवारी (ता. १७) पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुक पार पडली. दुपारी बारा ते रात्री बारादरम्‍यान तब्‍बल बारा तास गणेशभक्‍तांनी दणदणाट केला. मिरवणुकीत २० मंडळांनी सहभाग नोंदविला होता. ढोल-ताशा, बॅन्‍जोसह डीजेच्‍या तालावर गणेशभक्त मनसोक्‍त थिरकले. मिरवणुक मार्गावर बघ्यांची तुडूंब गर्दी झाली होती. दुपारी बाराला वाकडी बारव येथून पालकमंत्री दादा भुसे यांच्‍या हस्‍ते मानाच्‍या गणपतीची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. (Ganesh devotees danced for 12 hours in visarjan miravnuk )

याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्‍त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍यासह पक्षांचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी उपस्‍थित होते. पालकमंत्री भुसे म्‍हणाले, की गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आहे. महाराष्ट्राची प्रगती व्‍हावी, गोरगरिबांचे कल्याण होऊ दे असे साकडे त्यांच्याकडे घातले.

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चांगल्या योजना सुरू आहेत, त्याचा फायदा सर्वांना होऊ दे, अशी मागणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मिरवणुकीत सहभागी पहिल्‍या काही मंडळांनी दुपारी दीडपर्यंत मेनरोड गाठले होते. परंतु नंतरच्‍या गणपती मंडळांनी संथगतीने चाल केल्‍याने मेनरोडपर्यंत पोचण्यासाठी सायंकाळ उजाडली होती.

अन्‌ निवळला तणाव..

मिरवणुकीत सहभागी शेवटच्‍या काही मंडळांनी दूध बाजार परिसरातील धार्मिक स्‍थळासमोरील घोषणाबाजी केली. तसेच डिजिटल स्‍क्रीनवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेत्‍यांचे छायाचित्र दाखविल्‍याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, नितीन जाधव यांनी अतिरिक्त बंदोबस्तासह मंडळाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करत दोन्ही मंडळांना त्वरित पुढे काढल्‍यानंतर तणाव निर्वळला. धार्मिकस्‍थळ परिसरात मिरवणुक संपेपर्यंत बंदोबस्‍त कायम होता. (latest marathi news)

Nashik drummer practicing playing.
Nashik Ganesh Visarjan: 2 लाख गणेशमूर्तींचे संकलन; मागील वर्षाच्या तुलनेत घट

मिरवणुकीची क्षणचित्रे-

- दुपारी बाराला मिरवणुकीस प्रारंभ

- शहरातील २० सार्वजनिक मंडळांचा सहभाग

- दहा मंडळांकडून दुपारपर्यंत अर्धा मिरवणूक मार्ग पार

- डीजे आणि लेझर लायटिंगच्‍या मंडळांचा संथगतीने चाल

- शेवटच्‍या भोईराज मंडळाने रात्री दहाला दूध बाजार केले पार

- संवेदनशील भागातून मिरवणूक रवाना होताच पोलिसांचा सुटकेचा निःश्वास

- चिमुकल्यांचे गुलालवाडी लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण

- उंच-उंच गणेशमूर्ती मिरवणुकीत ठरल्‍या लक्षवेधी

- सात मंडळांकडून मिरवणुकीत डीजेचा वापर

- मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी लोटली गर्

Nashik drummer practicing playing.
Nashik Ganesh Visarjan Miravnuk : मुख्य विसर्जन मिरवणुकीत 21 मंडळांना परवानगी; मनपाचा मानाचा ‘श्रीं’ अग्रस्थानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.