नाशिक : दहा दिवसांच्या श्रीगणेशाला मंगळवारी (ता. १७) निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने विसर्जनासाठी २९ नैसर्गिक तर ५६ कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे. विसर्जन करताना पीओपी मुर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन टाइम स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर पन्नासपेक्षा अधिक फ्लॅटची स्कीम असलेल्या गृहप्रकल्पांकडून मागणी झाल्यास कृत्रिम तलावांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Ganesh Visarjan 2024 29 natural 56 artificial lakes)