Nashik Ganesh Visarjan 2024 : महापालिकेकडून 2 लाखांहून अधिक मूर्तींचे संकलन; भाविकांचा वाढता प्रतिसाद

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या उपक्रमांतर्गत गणेशमूर्ती थेट नदी पाण्यात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Idol Donation and Nirmalya Donation was done to Municipal Corporation
Idol Donation and Nirmalya Donation was done to Municipal Corporation esakal
Updated on

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या उपक्रमांतर्गत गणेशमूर्ती थेट नदी पाण्यात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास भाविकांचा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यंदा ५६०१ मूर्ती अधिक प्राप्त झाल्या आहेत. या वर्षी एकूण दोन लाख पाच हजार ८५४ मूर्तींचे संकलन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तीदान व निर्माल्य दानाचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. (Collection of more than 2 lakh idols by Municipal Corporation )

अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवाहनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण दोन लाख पाच ८५४ मूर्तींचे संकलन करण्यात आले. मागील वर्षांपेक्षा पाच हजार ६०१ अधिक मूर्तीदान करण्यात आल्या. मागील वर्षात दोन लाख २५३ मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. गणेश विर्सजनासाठी महापालिकेने २९ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तळांच्या ठिकाणांची यादीही जाहीर केली होती. सहा विभागांपैकी पंचवटी विभागातून यंदाही सर्वाधिक ७८ हजार ६७७ मुतींचे संकलन करण्यात आले. पूर्व विभागातून सर्वात कमी १० हजार ४२८ मूर्तींचे संकलन झाले.

निर्माल्य संकलनात वाढ

मागील वर्षी १५३.१ ५५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. या वर्षी १७४. ७८० मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आले. पीओपी मुर्ती विघटनासाठी घरच्या घरी विसर्जनाकरिता ७२५ किलो अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले. (latest marathi news)

Idol Donation and Nirmalya Donation was done to Municipal Corporation
Ganesh Visarjan 2024: गणपती मिरवणुकीत नाचून पाय दुखतायत? करा 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

विभागनिहाय संकलन

विभाग मुर्ती संख्या

पंचवटी ७८,६७७

सिडको २५,२६१

नाशिक रोड ४५,१३८

पूर्व १०,४२८

सातपूर ३१,११९

पश्चिम १५,२३१

यांचे सहकार्य

‘सकाळ’ माध्यम समूहाचे यीन, महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स, के. व्ही. नाईक कॉलेज, के. के. वाघ अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक कॉलेज, मराठा विद्या प्रसारक संस्था, संदीप फाउंडेशन, गोखले एज्युकेशन संस्था, रोटरी क्लब आदी.

''मागील वर्षांपेक्षा अधिक मूर्तींचे संकलन झाले आहे. पर्यावरणपूरक उत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढतं आहे. संकलित केलेल्या मूर्ती एकत्रित करून विधीवत विसर्जित करण्यात आले.''- डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

Idol Donation and Nirmalya Donation was done to Municipal Corporation
Nashik Ganesh Visarjan Miravnuk: आदेश झुगारून विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट; शांतता समितीच्या सदस्यांकडूनच आदेश पायदळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.