Nashik Ganesh Visarjan: नाशिकमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट, 8 बुडाले; शोधकार्य सुरु

महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
Ganesh Visarjan
Ganesh Visarjanesakal
Updated on

Nashik Ganesh Visarjan: नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाल्याचं वृत्त आहे. यांपैकी गोदावरी नदीत दोघांचा तर वालदेवी धरणाच्या पाण्यात तीन जण बुडाले आहेत. यामुळं नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. (Nashik Ganesh Visarjan four people drown Search operation on going)

Ganesh Visarjan
Ratnagiri Ganesh Visarjan : गुहागरमध्ये विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला; एका अल्पवयीन मुलीसह 2 ठार

गाेदापात्रातील पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू; एकाचा शाेध सुरु

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा नाशिक शहरातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील एकाचा शाेध सुरु असून घटनेप्रकरणी पंचवटी पाेलिसांत आकस्मिक मृत्यूच्या नाेंदी करण्यात आल्या आहेत.

बुधराम ओमप्रकाश माैर्या(वय २४, रा. कुमावत नगर, मखमलाबाद राेड, पंचवटी), राऊल सत्यनारायण माैर्या(वय १४, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी), साेहन भगवतीप्रसाद साेनकर(वय २८, रा. शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळ, पेठराेड, पंचवटी) आणि प्रदीप कुमार वर्मा (वय २१, सुदर्शन कॉलनी, पेठ रोड,पंचवटी, नाशिक) अशी चाैघा मृतांची नावे आहेत.

गाेदाघाटावर गुरुवारी(ता. २८) गणपती विसर्जन सुरु हाेते. त्याचवेळी सायंकाळी पाच वाजता बुधराम, राऊल, साेहन व त्यांचे दाेघे साथीदार गणपती विसर्जनासह आंघाेळीसाठी माेदकेश्वर मंदिरासमाेरील गाेदापात्रात उतरले. त्याचवेळी पाण्याच्या खाेलीसह प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे पाचही जण बुडाले.

घटनेची माहिती समजताच बचाव पथकाने जीवरक्षक आणि गळाच्या साहाय्याने मृतांचा शाेध घेतला असता शुक्रवारी सकाळी बुधराम, राऊल आणि साेहन यांचे मृतदेह टाळकुटेश्वर मंदिराजवळील वाहत्या पात्रात आढळून आले. यावेळी स्थानिकांसह नातलग व बघ्यांनी माेठी गर्दी केली हाेती. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, बेपत्ता असलेल्या एकाचा शाेध सुरु आहे.

Ganesh Visarjan
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; तब्बल 9 तासांहून अधिक काळ लागला वेळ

वालदेवी नदी पात्रात वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बडून मृत्यु

वालदेवी नदी पत्रात चेहेडी येथे दोघे व वडनेर येथे एक जणांचा बुडून मृत्यु झाला असून त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे.

नाशिकरोड मधील चेहडी शिव येथील इम्पायर मार्बल या इमराती मधील सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन साठी प्रसाद सुनील दराडे (वय 18) हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे (वय 22) राहणार खर्जूल मळा, चेहडी शिव येथील दारणा -वालदेवी नदीवरील संगमेशर येथे गेले होते.

मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमामात पाऊस झाल्याने नदी पात्र ओसंडून वाहत होते. यावेळी प्रसाद सुनिल दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला, तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण डुबून वाहून गेले.

नदी पत्राचे वाकडेतीकडे वळण, मोठे दगड यांचा मार लागून दोघे जखमी झाले. पाण्यात पोहता येत असल्याचे पाहून बंदोबस्त साठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रामदास विंचू, जीवरक्षक राजू गायकर यांनी सहकारी व नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले.

रुग्णवाहिका नसल्याने पोलीस वाहनातून त्याना रुग्णालयात नेण्यात आले. रोहित नागरगोजे यास जिल्हा रुग्णालयात तर प्रसाद दराडे यास बिटको रुग्णालयात उपचार केला. नंतर सिन्नर फाटा येथील खाजगी रुगणल्यात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याना तपासून मयत घोषित केले.

प्रसाद हा जे. डी. सी. बिटको महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो बारावी मध्ये शिकत होता तर रोहित हा सामनगाव येथील शासकिय तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेते होता. दोघे ही मित्र होते.

दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर जवळ घडली आहे. दुपारी भाविक वडनेर येथे वालदेवी नदी घाटावर गणपती विसर्जन करीत असतांना लहान पुलाजवळ हेमंत कैलास सातपुते (वय 35)हा विवाहित तरुण वालदेवी नदी पत्रात बुडला.

माजी नगरसेवक जगदीश पवार, केशव पोरजे यांनी अग्निशमक दलाला माहिती दिली असता अग्निशामक जवानांनी नदी पत्रात त्याचा शोध घेत शुक्रवारी (ता. २९) सकाळी मृत्य अवस्थेत आढळून आला. तिघावर अत्यसंस्कार करण्यात आले,

Ganesh Visarjan
Sangli Ganeshotsav : सांगलीत DJ च्या दणदणाटाने दोन तरुणांचा मृत्यू; पोलिस यंत्रणेने कानात बोळे घातलेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.