Nashik News : पावसामुळे गॅरेज व्यवसाय तेजीत; चारचाकींपेक्षा दुचाकी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक

Nashik : पावसामुळे गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहने अधिक प्रमाणात नादुरुस्त होत आहेत.
A garage technician repairing a bicycle
A garage technician repairing a bicycleesakal
Updated on

Nashik News : पावसामुळे गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहने अधिक प्रमाणात नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे विशेष करून दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज चालकांना सुगीचे दिवस आल्याचे गॅरेजमधील गर्दीवरून दिसत आहे. पावसाळा सुरू झाला की पावसाच्या पाण्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. दुचाकी, चारचाकी वाहनांचा यात समावेश असतो. त्यातल्या त्यात दुचाकीचे प्रमाण अधिक असते. चारचाकी वाहनांचे इंजिन बंदिस्त असल्याने सहसा पावसाचा त्यावर परिणाम होत नाही. ( Garage business grow due to rain )

मात्र दुचाकीचे इंजिन पूर्णत: उघडे असल्याने पावसाचे पाणी जाऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्लग शॉट होऊन भरपावसात रस्त्यांवर दुचाकी बंद पडत आहेत. गॅरेजमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहनचालक सरळ गॅरेज गाठत आहेत. रस्त्यावर साचणारे पाणी विशेषत: वाहन रस्त्याने धावताना प्लगमध्ये पाणी जाऊन प्लग शॉट होत आहे. त्याचप्रमाणे जागोजागी पडलेले खड्डे यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

त्यात वाहने आढळून वाहनांचे अपघात होऊन नुकसान होते. वाहन जागेवरच बंद पडते. अशा एक ना अनेक समस्या पावसामुळे निर्माण होत असल्याने सध्या गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे. जागोजागी असलेले प्रत्येक दुचाकीचे गॅरेज नादुरुस्त वाहनांनी भरलेले दिसत आहे. गॅरेज चालकाला वाहनांचे काम करण्यासाठी अतिरिक्त कामगारांची आवश्यकता भासत आहे. (latest marathi news)

A garage technician repairing a bicycle
Nashik News : प्रवाशांसाठी भररस्त्यात रिक्षांचे थांबे; वाहतुकीचा खोळंबा

दुचाकी नादुरुस्तीचे कारणे

-पावसाच्या पाण्याने प्लग शॉर्ट होणे

-पेट्रोल टॅंकमध्ये पाणी जाणे

-खड्ड्यांमध्ये वाहने आढळून नुकसान होणे

-रस्त्यावर वाहने घसरून वाहनांची तुटफूट होणे

-वायरिंग शॉर्ट होणे

-पंचर होणे

-कार्बोरेटरमध्ये पाणी, कचरा साचून वाहन बंद पडणे

- ब्रेक न लागणे

गॅरेज व्यवसायावर स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय अवलंबून आहे. वाहने दुरुस्त करत असताना विविध वस्तूंची आवश्यकता भासत असते. त्या वस्तू स्पेअर पार्ट विक्रेता दुकानावर उपलब्ध असल्याने नागरिक त्या खरेदी करत असतात. ब्रेक लायनर, ब्रेक ऑइल, प्लग यासह विविध वस्तूंची खरेदी विक्री अधिक होत असल्याने त्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे स्पेअर पार्ट व्यवसायही तेजीत आला आहे.

A garage technician repairing a bicycle
Nashik News : बांधकाम कामगारांना पेन्शनसाठी शासन सकारात्मक : कामगार उपायुक्त माळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.