Nashik News : गायदरपाडा रस्ता बंद असल्याने ‘डोली’ने महिलेचा मृतदेह घरी; कळवण तालुक्यातील सोनवणे कुटुंबीयांवर संकट

Nashik : उत्तमा गोटीराम सोनवणे (वय ४५) या महिलेचा मृतदेह लाकडाच्या डोलीच्या सहाय्याने सात किलोमीटर अंतर पायपीट करीत घरी पोहोचला.
Gaydarpada villagers carrying dead body in a doli. Stone rubble lying on Malgaon to Gaydarpada road.
Gaydarpada villagers carrying dead body in a doli. Stone rubble lying on Malgaon to Gaydarpada road.esakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं गायदरपाडा. पावसामुळे रस्त्याचे काम सद्यस्थितीत बंद. उपचारांसाठी गुजरातमध्ये, उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू, गावाला जायला रस्ता नाही... जंगलातून नदी-नाल्यांतून मध्यरात्री एकला पायवाट काढत उत्तमा गोटीराम सोनवणे (वय ४५) या महिलेचा मृतदेह लाकडाच्या डोलीच्या सहाय्याने सात किलोमीटर अंतर पायपीट करीत घरी पोहोचला. मृत्यू झाल्यावरही नाशिक जिल्ह्यातील सीमारेषांवर असलेल्या गावातील ग्रामस्थांच्या यातना अद्यापही संपल्या नसल्याची बाब पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. (Gaydarpada road was closed body of woman was brought home by dolly )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.