Nashik News : विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा : रवींद्र मिर्लेकर यांचे बूथ प्रमुखांना आवाहन

Nashik: जास्तीत जास्त जागा आघाडीच्या पारड्यात पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
Officials and activists of Shiv Sena (Ubatha) present at the meeting on Friday.
Officials and activists of Shiv Sena (Ubatha) present at the meeting on Friday.esakal
Updated on

Nashik News : आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे महाविकास आघाडीच्यादृष्टीने एक प्रकारे सत्वपरीक्षाच असून जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा आघाडीच्या पारड्यात पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी शुक्रवारी (ता.२६) येथे केले. (Get to work to win assembly elections)

शिवसेना पश्चिम नाशिक विधानसभा बूथप्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, सावता नगर येथे पार पडला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, कोअर कमिटी सदस्य डी. जी. सूर्यवंशी, पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख विलास कारेकर.

उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी,युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य दीपक दातीर,युवासेना जिल्हाधिकारी बालम शिरसाट,नीलेश साळुंखे,चंद्रकांत पांडे, समाधान देवरे,विलास आहेर,गोकूळ निगळ, विष्णू पवार,नाना पाटील,रमेश उघडे,सचिन राणे,कैलास चुंबळे,त्र्यंबक कोंबडे, पवन मटाले, माजी सभापती हर्षा बडगुजर.

संतोष गायकवाड, रत्नमाला राणे, मधुकर जाधव, नयना गांगुर्डे, सीमा बडदे, शीतल भामरे, दादाजी आहेर, अलका गायकवाड, श्रुती नाईक, कीर्ती जवखेडकर, वृक्षाली सोनवणे, शारदा दोंदे, सविता गायकर आदी होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका तर नव्या जोमाने पुन्हा कामाला लागा. (latest marathi news)

Officials and activists of Shiv Sena (Ubatha) present at the meeting on Friday.
Nashik News : नाशिकमध्ये देशाचे कौशल्य हब होण्याची क्षमता : केंद्रीय सचिव अतुलकुमार तिवारी

कोणत्याही निवडणुकीत बूथ प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची असते.घरोघरी जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मिर्लेकर यांनी आपल्या भाषणात केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली आहे.

या मतदारसंघ जिंकायचाच हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सर्व मतदार संघ पिंजून काढण्यास सुरवात करावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. मतदार संघात बूथरचना मजबूत झाली असून कोणतेही आव्हान पेलण्यास शिवसैनिक सज्ज असल्याचेही ते पुढे म्हणाले. कोअर कमिटी सदस्य डी.जी.सूर्यवंशी यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या बूथरचनेचा आढावा सादर केला.

Officials and activists of Shiv Sena (Ubatha) present at the meeting on Friday.
Nashik Dengue Update : डेंगींच्या प्रलंबित चाचण्या आज निघणार निकाली! जिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या बैठकीत निर्णय

पक्षाची मजबूत बांधणी झाली असून नेमून दिलेली कामे सर्वजण निष्ठेने पार पाडीत आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली. मेळाव्यावेळी मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम विभाग अध्यक्ष कौस्तुभ सांवत यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यात प्रामुख्याने सिद्धांत निकम, निखिल गाडे, महेश बडे, रामेश्वर गवई, रितेश सावंत, रामेश्वर ढाणे आदींचा समावेश होता.

मेळाव्यास पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच बुथप्रमुख चंद्रशेखर वेटकर, योगेश दुसाने, राकेश वडगे, वाल्मीक कदम, गोपीनाथ देहाडे, संदीप अहिरे, जगदीश पवार, शीतल अहिरे, प्रकाश मोरे, सिद्धेश निकम, गौरव देसले, सौरभ डांगरे, महेश गायकवाड, भावेश जगताप, प्रफुल्ल विसपुते, रावसाहेब आल्हाट, दीपक अहिरे, संभाजी डांबरे, अशोक दबडे, निखिलेश बडगुजर, प्रवीण राऊत, रामदास शिंदे, भारती पाटील, प्रतिभा साळुंखे, वैशाली तिडके, मनीषा निरभवणे, अनिता चव्हाण, संजय कडाळे असे ३९० बुथप्रमुख उपस्थित होते.

Officials and activists of Shiv Sena (Ubatha) present at the meeting on Friday.
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.