Ghoti MSRTC Depot : घोटी बसस्थानक ठरले एसटी महामंडळाचे सावत्र अपत्य....!

Latest Nashik News : स्थानकात सर्व सोयींयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते. नाशिक-घोटी प्रवास शक्यतो खासगी टॅक्सी व वाहनाने करण्यावर प्रवाशी भर देत आहे.
Bus stand sheltered for stray animals, drinking water taps locked & toilets in disrepair and unsanitary condition
Bus stand sheltered for stray animals, drinking water taps locked & toilets in disrepair and unsanitary conditionesakal
Updated on

Ghoti MSRTC Depot : वर्तमान सरकार, भविष्यास आकार..जनतेचे हे सरकार’ अशा विषयाच्या अनेक जाहिरातीचे फलक आपण एसटीवर पाहतो. मात्र राज्य परिवहनच्या व्यवस्थेची दुरवस्था, चालक- वाहकांच्या हालअपेष्टासह कुशल कर्मचारींची रिक्त पदे, स्वच्छतेची 'ऐसी तैशी, त्यात विभागीय कार्यालयाकडून नादुरुस्त बसची वेळेवर न होणारी दुरुस्ती आणि साधनसामुग्री उपलब्धता न होणे आदी अनेक समस्यांनी येथील स्थानकाला ग्रासले आहे. तालुक्यासाठी महत्त्वाच्या या स्थानकात बाहेरील बस फारशा येत नसल्याने स्थानकाकडे तसे महामंडळाने सावत्र अपत्य म्हणूनच पाहिले आहे. (Ghoti Depot negligence of ST Corporation)

बसची दुरवस्था, वेळेवर न मिळणे यापेक्षा बसस्थानकावरील गैरसोयींनी नागरिक येथे येतच नसल्याने अनेक जण खासगी वाहतुकीला पसंती देतात, त्यामुळे महामंडळाने येथील स्थानकाकडे लक्ष देऊन दुरुस्तीसह आवश्‍यक त्या सुविधा आणि बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

वाहक- चालक, अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील स्थानकाची महामंडळाकडून होणारी छळवणूक विशद करतात, तेव्हा अंगावर काटाच उभा राहतो. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी आगाराची दयनीय अवस्था पाहून बसने प्रवास करणे नागरिकांना धोक्याचे वाटू लागले आहे. घोटी येथील बसस्थानकावर भटकी कुत्री, जनावरे यांचा वावर पाहून व स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असलेले स्थानक म्हणून जिल्ह्यात परिचित व्हावे अशी येथील परिस्थिती आहे.

पिण्याच्या पाण्याची गैरसोय

प्रवाशांना पिण्यासाठी जुन्याच टाक्यात पाणी टाकून फिल्टर व्यवस्था केलेली आहे. मात्र त्याचे नळे कायमच कुलूपबंद असल्याने नळांना पाणी येणार तरी कुठून? नागरिकांना बाजारातून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. ज्यांची परिस्थिती नाही त्यांचे काय ? असे अनेक प्रश्न उभे आहेत.

शौचालयांवर गवताचा डोंगर..

प्रवाशांना शौचालयाची कित्येक वर्षांपासून सुविधा नाही. त्यात मागील महिन्यात आमदार खोसकर यांनी महिलांसाठी निधीची तरतूद करून शौचालय बांधले, मात्र विद्यार्थी-पुरुषांना आजही घाणीतूनच जावे लागत आहे. पूर्वी भाडे तत्त्वावर शौचालय चालवण्यासाठी दिले होते, अनेक अडचणीत भर पडावी त्याप्रमाणे पाणीटंचाई, अनामतीवरून तेही अखेर बंद पडले. आज त्याची अवस्था म्हणजे शौचालयांवर गवताचा डोंगर उगवला आहे. जनावरे देखील जाणार नाहीत, अशा ठिकाणी प्रवाशांना जावे लागणे लोकप्रतिनिधी- राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे. (latest marathi news)

Bus stand sheltered for stray animals, drinking water taps locked & toilets in disrepair and unsanitary condition
Amalner MSRTC Depot: अमळनेर येथील बसस्थानक असुविधांचे आगार! प्रवाशांचे हाल; परिसरात पायाभूत सुविधांची वाणवा, कर्मचाऱ्यांचीही गैरसोय

जागोजागी घाणीचे साम्राज्य

बसस्थानकात कोणत्याही बाजूने प्रवेश करा, तिथे स्वागत घाणीनेच होते. स्थानकातील परिसरात असलेली दुकाने व्यवस्था नसल्याने बंद पडली, त्यात परवाना दिलेल्यांपैकी मोजकेच दुकाने आज भाडे तत्त्वावर सुरू आहेत. त्यांनाही पाहिजे त्या सुविधा मिळत नाही.

यामध्ये भर म्हणून स्वागताला भटकी कुत्री, जनावरे आहेतच, जागोजागी भिंती लाल रंगाने रंगल्यानंतर बसस्थानकात दुर्गंधी येत आहे. आगाराची स्वच्छता एकाच कर्मचारींनाही पगार वेळेवर होत नसल्याने स्वच्छतेची अवस्था वाईट झाली आहे.

बस कधीही पडतात बंद...

येथील बसस्थानकातील बस मुदत संपलेल्या, दुरुस्ती झालेल्या पण नेहमीच कुठेही बंद पडणाऱ्या अशा आहेत. वेळेवर विभागीय कार्यालयाकडून साधन सामग्री मिळत नसल्याचे समजते. एकूण बसची संख्या ४५ आहे. वाहनांची नादुरुस्त संख्या जास्त आणि कर्मचारी रिक्त पदेही जास्त आहेत. ५० कुशल कर्मचारी असताना केवळ ३० कर्मचारी वर्कशॉपमध्ये आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही सुविधा नाहीत. बस वळण घेताना चालक अक्षरक्षः मेटाकुटीस येतो. बसची बॉडी हलून कधी उलटी होते की काय याची सतत भीती जाणवते इतक्या बस जीर्ण झालेल्या आहेत.

९ कोटी मंजूर, पण टेंडर नाही

बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने पावसाळ्यात गळते. आमदार हिरामण खोसकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून ९ कोटी रुपये मंजूर केले, मात्र आजही त्याचे टेंडर झालेले नसल्याने निधी राहतो की जातो याचीही शाश्‍वती नाही.

चालकवाहकांची सोय नाही...

लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या देखील अधिक आहे. मुंबई नाशिक महामार्ग, राज्य मार्गावर धावणाऱ्या बसचे चालक - वाहक बसमध्येच झोपतात. स्थानकात सर्व सोयींयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते. नाशिक-घोटी प्रवास शक्यतो खासगी टॅक्सी व वाहनाने करण्यावर प्रवाशी भर देत आहे.

Bus stand sheltered for stray animals, drinking water taps locked & toilets in disrepair and unsanitary condition
Satana MSRTC Depot : जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास! नव्या गाड्यांची प्रतिक्षा; परिसरात खड्डे अन्‌ घाणीचे साम्राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.