Nashik Protest News : घोटी टोलनाका एक तासापासुन बंद! पहिले खड्डे बुजवा मग टोल घ्या: उबाठा शिव सैनिकांचे आंदोलन

Protest News : शिवसैनिकांनी गेल्या एक तासापासुन आंदोलन करत टोलनाका बंद केल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
Shiv Sainik stood up while protesting at the toll booth.
Shiv Sainik stood up while protesting at the toll booth.esakal
Updated on

इगतपुरी : घोटी टोलनाका परिसरात उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गेल्या एक तासापासुन आंदोलन करत टोलनाका बंद केल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. शिवसैनिकांनी घोटी टोल नाका अडवला असुन मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन केल्यामुळे बंद पडला आहे. घोटी टोल नाका परिसरामध्ये माजी निर्मला गावित, वसंत गिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. ( Ghoti toll booth closed for hours due to protest of shiv sena group )

घोटी टोलनाका परिसरामध्ये आमदार निर्मला गावित यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचा देखील काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे होणाऱ्या अपघात थांबावेत या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. (latest marathi news)

Shiv Sainik stood up while protesting at the toll booth.
Nashik Protest News : प्रस्तावित टाकसाळीविरोधात देशभर आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्त्यांचा देखील आंदोलनात मोठा सहभाग आहे. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी विना टोल वाहने सोडले. मुंबई नाशिक अंतर खड्ड्यांमुळे सहा ते सहा तास लागत असल्यामुळे अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे टोल न घेण्याची मागणी करून टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. विशेष म्हणजे आंदोलक व वाहन धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचेही दिसून आले.

Shiv Sainik stood up while protesting at the toll booth.
Nashik Protest News : लाल वादळ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com