Girish Mahajan on Anil Deshmukh : अनिल देशमुखांनी पेन ड्राइव्ह दाखवावाच; गिरीश महाजन यांचे आव्हान

Girish Mahajan on Anil Deshmukh : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राइव्ह असेल, तर तो त्यांनी दाखवावाच, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देशमुख यांना दिले.
Girish Mahajan on Anil Deshmukh
Girish Mahajan on Anil Deshmukhesakal
Updated on

Girish Mahajan on Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राइव्ह असेल, तर तो त्यांनी दाखवावाच, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देशमुख यांना दिले. भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये श्री. महाजन आले होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशमुख यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. (Girish Mahajan challenge appeal to Anil Deshmukh must show pen drive )

माजी गृहमंत्री देशमुख हे स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा आरोप पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख यांनी मात्र वाझे यांचे आरोप फेटाळून लावले. फडणवीस यांची ही नवी चाल असल्याचे त्यांनी म्हटले. फडणवीस यांच्याविरोधात आपल्याकडे सर्व पुरावे पेन ड्राइव्हमध्ये असल्याचा दावा देशमुख यांनी केला. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी देशमुख यांना ‘टार्गेट’ केले.

श्री. महाजन म्हणाले, की वाझे यांनी केलेला आरोप हा जुना आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतले होते. त्यांना परत का घेतले, असा प्रश्‍न उपस्थित करताना देशमुख यांच्याकडे फडणवीस यांच्यासंदर्भातील पेन ड्राइव्ह असल्याचे ते म्हणतात. असेल तर त्यांनी तो दाखवावा. आमच्याकडेही पेन ड्राइव्ह होता. तो आम्ही विधानसभेत दाखविला आहे.

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यात महाविकास आघाडीचे नेतेच फसत आहेत. या प्रकरणी काय करायचे ते यंत्रणा ठरवेल. आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे नाव असल्याचे म्हटले आहे. (latest marathi news)

Girish Mahajan on Anil Deshmukh
Girish Mahajan Audio Clip : धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले? रमेश कराड यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल...

वाझे यांनी काय पत्र लिहिले, हे मला नक्की माहीत नाही. पण, त्यात नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे समर्थनही महाजन यांनी केले. कोणी काय कारनामे केले आहेत? किती पैशांची मागणी केली? किती खंडण्या मागितल्या? याचीही चौकशी व्हावी. देशमुख यांच्यावरील आरोप सिद्ध होत असल्याने त्यांना यातना होत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले.

वाझे यांच्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, अँटोलिया प्रकरणातील आरोपी कुठे आहेत? मुंबई पोलिस आयुक्तांना क्लीन चीट दिली आहे? आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावर बोलताना महाजन यांनी राऊत यांच्या जिभेला हाड नाही. त्यांना कोणी सिरियस घेत नाही, अशी टीका केली.

मुंबई महामार्गाचे चित्र बदलेल

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आठ ते दहा तास प्रवासासाठी लागतात, ही वस्तुस्थिती मान्य करीत महाजन यांनी येत्या महिनाभरात चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी निश्चितीबाबत सुरू असलेल्या सर्वेसंदर्भात बोलताना त्यांनी सर्वेबरोबरच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चितीचा निर्णय घ्यायला हवा, असे सुचविले.

Girish Mahajan on Anil Deshmukh
Girish Mahajan : संजय राऊत म्हणजे बांग देणारा कोंबडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.