Girish Mahajan : विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा : गिरीश महाजन

Girish Mahajan : मतभेद बाजूला ठेवून विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Minister Girish Mahajan while guiding BJP district extended executive meeting. MLA Rahul Dhikle, Devyani Farande, Seema Hire and office bearers on the platform.
Minister Girish Mahajan while guiding BJP district extended executive meeting. MLA Rahul Dhikle, Devyani Farande, Seema Hire and office bearers on the platform.esakal
Updated on

Girish Mahajan : लोकसभेच्या अपयशामुळे खचून न जाता अपयशाची कारणे शोधा व आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. खुटवड नगर येथे शनिवारी (ता.३) झालेल्या भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संघटन सरचिटणीस रवी अनासपुरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, माजी आ. बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, सुनील बच्छाव, माजी महापौर सतीश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Girish Mahajan statement of Work hard for Vidhan Sabha )

महाजन यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी देशमुख आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. तुरुंगातून जामीनावर सुटलेले देशमुख तीन वर्ष गप्प का बसले, असा सवाल उपस्थित करत देशमुख, वाझे यांची नार्को टेस्ट केल्यास ‘दूध का दूध पाणी का पाणी’ समोर येईल, असा दावा केला.

राज्यात देवेंद्र फडणवीस एकमेव माणूस आहे जे विरोधकांना पुढे जाऊ देत नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून ते बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहे. पण आपला नेता खमक्या आहे, विरोधकांना पुरून उरणारा असल्याचे महाजन म्हणाले. यावेळी नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे आमदार निवडून आणण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. (latest marathi news)

Minister Girish Mahajan while guiding BJP district extended executive meeting. MLA Rahul Dhikle, Devyani Farande, Seema Hire and office bearers on the platform.
Girish Mahajan : महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या : गिरीश महाजन

संघटन सरचिटणीस रवी अनासपुरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना संपर्क, संवाद आणि सहचार्य या त्रिसूत्रीवर काम करा. येत्या २० ऑगस्टपूर्वी प्रत्येकाने नवीन मतदार नोंदणी करून घेत बोगस मतदार बाहेर काढण्याचे आवाहन केले. यावेळी आ. सिमा हिरे, लक्ष्मण सावजी, राहुल ढिकले, सुनील बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस शहर व ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.

घरावर कमळध्वज फडकवा

१५ ऑगस्टपूर्वी ५ हजार तिरंगा झेंडे घरोघरी फडकावत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन संघटन सरचिटणीस अनासपुरे यांनी उपस्थितांना केले. वर्षभरात १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे हे तीन दिवस वगळता वर्षभर कमळ ध्वज फडकवण्याचे आवाहन करत येत्या १६ ऑगस्टला सर्वांनी घरावर कमळध्वज फडकवा असेही अनासपुरे यांनी सांगितले.

Minister Girish Mahajan while guiding BJP district extended executive meeting. MLA Rahul Dhikle, Devyani Farande, Seema Hire and office bearers on the platform.
Girish Mahajan : स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठीचे नियोजन करा; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.