Nashik News : शाळेला टप्पा देत मुलींनी केला ‘एन्जॉय’ अन पालक-पोलिसांचे मात्र दणाणले धाबे!

Nashik News : सतत अभ्यासावरून पालकांचा ओरडा... सारखं तेच तेच... याला कंटाळून एकाच शाळेतील तीन-चार मुलींनी शाळेला टप्पा दिला आणि थेट दिंडोरी गाठली अन्...
School bunk file photo
School bunk file photoesakal
Updated on

नाशिक : सतत अभ्यासावरून पालकांचा ओरडा... सारखं तेच तेच... याला कंटाळून एकाच शाळेतील तीन-चार मुलींनी शाळेला टप्पा दिला आणि थेट दिंडोरी गाठली. मात्र सकाळी शाळेत गेलेल्या मुली सायंकाळी घरी न परतल्याने पालकांचे धाबे दणाणले. एकाचवेळी तीन-चार मुली बेपत्ता झाल्याने पालकांसह पोलिसांकडून शोधमोहीम सुरू झाली. अखेर मुली मैत्रिणीच्या घरी सुखरूप मिळून आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. (Nashik girls bunked school near makhmalabad news)

मखमलाबाद परिसरातील शाळेमध्ये शिकणाऱ्या आठवी ते दहावीच्या वर्गातल्या चौघी मैत्रिणी शुक्रवारी (ता. ५) नेहमीप्रमाणेच शाळेला गेल्या. या तिन्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शाळेला जाण्यासाठी चौघी मैत्रिणी या मखमलाबाद गावात आल्या. परंतु त्यांचे शाळेमध्ये जाण्याचे मन होत नव्हते.

सतत अभ्यासावरून पालकांचे बोलणे, त्यांची चीड-चीड यावरून त्यांनी शाळेलाच टप्पा देण्याचा प्लॅन केला. पण, शाळेला टप्पा द्यायचा तर दिवसभर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दिंडोरीला फिरायला जायचा विचार करीत रिक्षा बोलाविली आणि चौघीही रिक्षातून दिंडोरी तालुक्यातील एका गावात पोचल्या.  (latest marathi news)

School bunk file photo
Crime News: फ्लॅटचे दाखवले आमिश अन् झाली ५० लाखांची फसवणूक; पोलिसांनी केली अटक

गावातील एका लग्नामध्ये सहभागी झाल्यानंतर सायंकाळचे पाच वाजले तसे त्यांना घरी जाण्याचे भान आले. घरी कसे जायचे, फार वेळ होईल, आई-वडील रागवतील याची भीती वाटू लागल्याने त्यांनी आपल्या पाचव्या मैत्रिणीशी संपर्क साधला. यादरम्यान त्यांच्यातील एकीने घर गाठले.

याची माहिती म्हसरूळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाला मिळाली. तिच्याकडून माहिती मिळताच पथकाने मुली थांबलेल्या मैत्रिणीचे घर गाठून तिघींना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलींकडे विचारणा केली असता, तिघींनी ‘सहजच फिरायला गेलो’, असे सांगितले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

School bunk file photo
Nashik Naresh Karda Case : बांधकाम व्यावसायिकाविरोधात आणखी एक गुन्हा; जामिनावर असलेल्या कारडा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.