Manmad MSRTC Depot: प्रवाशांची सेवा कमी गैरसोयीच अधिक! राज्य परिवहन महामंडळाने गौरविलेले हेच का ते सुंदर स्वच्छ बसस्थानक?

MSRTC Depot : महामंडळाच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले हे आगार आज समस्यांच्या गर्तेत सापडल्यामुळे सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
Manmad MSRTC Depot
Manmad MSRTC Depotesakal
Updated on

मनमाड : मुदत संपलेल्या बसेस, स्थानकात निर्माण झालेले खड्डे, साचलेले पाण्याचे डबके, धुळीचे लोट, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त परिसर असे एकूणच चित्र पाहता मनमाडचे आगार हे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ की ‘गैरसोयी’साठी आहे, असा संतप्त सवाल प्रवाशात विचारला जाऊ लागला आहे. चार वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले हे आगार आज समस्यांच्या गर्तेत सापडल्यामुळे सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (Given of unsanitary and smelly area Manmad Agar is for service to passengers inconvenience )

रेल्वेसह इंदूर -पुणे राष्ट्रीय आणि चार राज्य महामार्गावरील मनमाड हे महत्वाचे शहर आहे. इंदूर, पुणे औरंगाबाद, शेगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नगर, कल्याण आदि ठिकाणी जाण्यासाठी हजारो प्रवासी येत असतात. २९ डिसेंबर १९६१ ला तत्कालीन महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे सदस्य (कै.) वसंतराव नाईक यांच्या हस्ते मनमाड बस स्थानकाचे उद्घाटन झाले. तब्बल ६३ वर्षात स्थानकात कालौघात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या ४१ बस असून त्यातील बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या बस लांब पल्ल्यासाठी वापरल्या जातात. मात्र पाच वर्षापासून आगाराला नवीन एकही बस मिळालेली नाही.

चालक वाहकांना मिळाव्यात सुविधा

प्रवाश्यांसाह आगारातील कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. चालक वाहकांना आरामासाठीच्या रेस्ट रूमची दुरवस्था झाली आहे. येथे कर्मचारी नाहीथ. संडास बाथरूमची आणि राहण्याची चांगली व्यवस्था नाही. अंथरून पांघरून नाही. मुक्कामी राहणाऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी नाही. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही.

जेवणाचे डबे खाण्यासाठी व्यवस्था नाही, कर्मचाऱ्यांना उपाहारगृह नाही. पावसाळ्यात छत गळत असते. ज्या चालक वाहकांवर प्रवाश्यांची सुरक्षा निर्भर असते अशा चालक वाहकांना देखील आरामाची सुविधांची तितकीच गरज असते. महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कक्षाची गरज आहे. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. (latest marathi news)

Manmad MSRTC Depot
Malegaon MSRTC Depot : उत्पन्नावर आघाडीवर असूनही मालेगाव आगाराला समस्यांचा विळखा!

- १० नवीन गाड्यांची मागणी, मात्र एकही बस मिळेना
- मोडकळीस आलेल्या बसेसचे आयुर्मान संपुष्टात
- रेल्वेच्या अनुषंगिक गुन्हेगारीचा फटका बसस्थानकाला
- मोबार्सल, पर्स, सोनसाखळी चोरट्यांचा उपद्रव
- स्थानकावर पोलिसांची नेमणूक नसल्याने गैरसोय
- फाटलेले सीट, तुटलेल्या अवस्थेतील बैठक व्यवस्था
- बसेसच्या पत्रा गंजलेला, काचा फुटलेल्या
- जीव मुठीत घेऊन प्रवाशांवर प्रवास करण्याची वेळ

आगाराचा दर्जा - क
एकूण बस - ४१
रोजच्या बसफेऱ्या -२२७
चालक वाहक संख्या - १६०
यांत्रिक कर्मचारी - २७
प्रशासकीय कर्मचारी १८
स्वच्छता कर्मचारी - ३
एकूण कर्मचारी - २०८

Manmad MSRTC Depot
Sinnar MSRTC Depot : सुविधायुक्त बसस्थानकाला अवैध पार्किंगची डोकेदुखी! विमानतळाच्या धर्तीवरवरील बस ट्रमिनलची सर्वांना भुरळ

''आगारात ४१ बस आहेत. नवीन बसेसची मागणी केली आहे. समस्या तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न असतो. महामंडळाचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी कर्मचारी कामात तत्पर असतात. प्रवाशांसाठी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.''- विक्रम नागरे, आगार व्यवस्थापक, मनमाड

''चाळीसगावला जाण्यासाठी बसची वाट पाहत आहे. मनमाड स्थानकातून सोडल्या जाणाऱ्या अनेक बस जुन्या, खिळखिळ्या झालेल्या आहेत. नव्या बस आगाराला दिल्या पाहिजे. प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास झाला पाहिजे.''- अनिल जाधव, प्रवासी

''मनमाड बस स्थानकाची इमारत फार जुनी झाली होती. नवे बसस्थानक उभारण्याची मागणी होती. त्यानुसार पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. भूमिपूजन झाले आहे. बसस्थानक इमारतीचे तोडकाम सुरू झाले आहे. लवकर बांधकाम सुरू होऊन सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त भव्य बसस्थानक उभे राहिल. प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.''- आमदार सुहास कांदे, मनमाड

Manmad MSRTC Depot
Jalgaon MSRTC Depot : बसपोर्टची प्रतीक्षाच; ‘पे ॲंड पार्क’ही बंद! जळगाव बसस्थानक अडकले असुविधांच्या गर्तेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.