Nashik: बिबट्याच्या दहशतीच्या छायेत गोदाकाठ! सातत्याने होतेय दर्शन; संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्याची गरज

Latest Leopard News : नव्या अडचणींची भर पडून शेतकऱ्यांना शेतीची कामे करणेही मुश्कील झाले आहे. सुरवातीला एक- दोन दिसणाऱ्या बिबट्यांची संख्या आता अनेक पटीत झाली आहे.
Leopard's Horns A leopard spotted on the road late at night in Shingwe village.
Leopard's Horns A leopard spotted on the road late at night in Shingwe village.esakal
Updated on

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील अनेक गावांत बिबट्यांचा अधिवास आढळत आहे. परिणामी मानव-बिबट्या संघर्षामध्ये वाढ होत असून, बिबटयांचे मानव, पशुधनावरील हल्ले वाढत आहेत. सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्यांची एकूण संख्या मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बाबी लक्षात घेऊन गोदाकाठ भागातील गावे 'संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र' घोषित करण्यात यावेत अशी मागणी या भागातून वाढत आहे. (Godakath in leopard terror)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.