नाशिक : तपोवनातील रामसृष्टी येथे संत, महंत, स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत श्रीराम कपिला गोदावरील नदी संगम आरती समितीची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारपासून (ता.१७) या आरतीस प्रारंभ होत आहे. तपोवन येथे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातुन उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या मुर्तीचे पावित्र्य राहावे व त्याचबरोबर कपिला व गोदावरी नदीचे महत्त्व अबाधित राहून परिसरात स्वच्छता राहावी यासाठी प्रतिदिन प्रभू श्रीराम व कपिला गोदावरी नदीची आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Godavari Aarti Establishment of Sriram Kapila Godavari River Sangam Aarti Committee )