Godavari Mahaarti: महाआरत्यांनी गोदाकाठ दुमदुमला! गोदावरी महाआरतीस प्रारंभ

Godavari Mahaarti : शासनाने स्थापन केलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने सोमवारी गोदावरी महाआरती व गोदाजन्मोत्सव साजरा केला.
Godavari Mahaarti
Godavari Mahaartiesakal
Updated on

नाशिक : ‘हरहर गोदा..हरहर गंगे, गोदावरी माता की जय’ असा जयघोष करत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने सोमवारी (ता.१९) गोदावरी नदीच्या महाआरतीचा प्रारंभ केला. विशेष म्हणजे गंगा गोदावरी पुरोहित संघ व रामतीर्थ सेवा समितीची आरती एकाच वेळी सुरु झाल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: रामतीर्थ सेवा समितीच्या आरतीस पूर्णवेळ हजेरी लावली. साधू-महंतांसह भाविकांच्या अलोट गर्दीने महाआरतीचे सूर आसमंतात घुमले. (nashik Godavari Aarti marathi news)

शासनाने स्थापन केलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने सोमवारी गोदावरी महाआरती व गोदाजन्मोत्सव साजरा केला. सायंकाळी ७ वाजेला गोदा आरतीसाठी थोर संन्यासी डॉ. सखा सुमंत महाराज, ‘इस्कॉन’चे प्रमुख ब्रह्मचारी शिक्षाष्टकम दास, श्रीमान दादा वेदक, स्वामी निर्मलानंद महाराज, स्वामी कंठानंद महाराज, आचार्य गोस्वामी दीक्षित, दत्तदास महाराज, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांसह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

आरतीसाठी दुतोंड्या मारुतीशेजारी पाच चौथरे निर्माण करण्यात आले. येथे चार महिला व तीन पुरुषांनी हाती समई घेऊन गोदावरीचे पूजन केले. पावणे सहा मिनिटांची मुख्य आरती झाली. तत्पूर्वी, प्रमुख अतिथींच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वाटप झाले.

स्वामी सखा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून २१ वर्षांपूर्वी स्वामी मित्र मेळा व शिवनेरी मित्र मंडळाने गोदाआरतीचा संकल्प केला. त्याची आज पूर्ती होत असल्याचा आनंद आहे. गोदावरी सेवा समितीला भरघोस यश लाभो ही गोदाचरणी प्रार्थना त्यांनी केली. गोदावरीचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे.

जोपर्यंत हा इतिहास राहील तोपर्यंत गोदावरीची आरती होत राहील, असा विश्वास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला. एकसंध समाज घडवण्यासाठी गोदावरीची आरती उपयोगी ठरावी, असा विश्वास दादा वेदक यांनी व्यक्त केला. शिक्षाकष्टम दास यांनीही गोदाआरतीस शुभेच्छा दिल्या.

Godavari Mahaarti
Nashik Lok Sabha Election: दिनकर पाटील यांची लोकसभेसाठी फिल्डिंग जोरात! 20 मंडलाध्यक्षांनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती

जयंत गायधनी यांनी प्रास्ताविक केले. तर मुकुंद खोचे, आशिमा केला यांनी स्वागत केले. मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोदावरी गीत सादर केले. डॉ. अंजली वेखंडे यांनी आभार मानले. आरतीप्रसंगी दोन्ही ठिकाणी भाविकांनी एकच गर्दी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

पुरोहित संघाचा आवाज दाबला

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची आरती सुरु होताच पुरोहित संघाने स्पीकरचा आवाज वाढवला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आवज कमी करण्याची सूचना दिली.

गोदाकाठी जणू कुंभमेळ्याची अनुभूती

गोदातीरी महाआरतीनिमित्ताने दोन्ही संघटनांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आरतीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवली. या महाआरतीसाठी नाशिककरांनी गोदाकाठी एकच गर्दी केली. त्यामुळे गोदाकाठी जणू कुंभमेळा भरला की काय, याची अनुभूती घेतली.

Godavari Mahaarti
Khelo India Talent Hunt: ‘खेलो इंडिया टॅलेंट हंट’‍ नोंदणीसाठी आज अखेरची मुदत! SAIच्‍या उपक्रमातून खेळाडूंना मिळणार मार्गदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.