Rain Forecast : नाशिक जिल्ह्यात धुवाधार! गोदेला पहिला पूर; आज पुन्हा ‘यलो अलर्ट’

Rain Forecast : रविवारी (ता. ४) दुपारी बारापासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला.
 first flood of this season
first flood of this seasonesakal
Updated on

Rain Forecast : नाशिकसह जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून अधूनमधून विश्रांती घेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महत्त्वाची सात धरणे तुडुंब भरली असून, शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८०.७१ टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे रविवारी (ता. ४) दुपारी बारापासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला. रविवारी दिवसभर पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केल्यानंतर सोमवारी संपूर्ण जिल्ह्यास हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. (Godavari experienced its first flood of this season)

पावसाचे प्रमाण कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जून व जुलैत समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून होती. शुक्रवार (ता. २)पासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. यामुळे गंगापूर, दारणा, भावली, पालखेड, चणकापूर, कडवा या धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील छोट्या- मोठ्या २४ धरणांमध्ये सरासरी ६५.२३ टक्के इतका साठा आहे.

जिल्ह्यात १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसांच्या मुसळधारेने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर या दुष्काळग्रस्त भागात मुसळधार पावसाअभावी विहिरींना पाणी आले नव्हते. आता विहिरींना पाणी येण्यास मदत होणार आहे. मका, बाजरी, कापूस, सोयाबीन, भात पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक व सुरगाण्यातील प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. संततधारेमुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे. भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दरेवाडी वस्तीत पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे.

''जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदीकाठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेऊन आपल्या पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच; मात्र नागरिकांनीही सतर्क राहत गरज असेल, तरच घराबाहेर पडावे.''- दादा भुसे, पालकमंत्री (नाशिक)

 first flood of this season
Nashik Monsoon News : इगतपुरी तालुक्यावर पावसाची मेहेरबानी; भावली, दारणातून विसर्ग

पावसाच्या ठळक घडामोडी

- गोदावरीला हंगामातील पहिला पूर

- पूर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

- एकट्या इगतपुरी तालुक्यात २४० मिलिमीटर पावसाची नोंद

- चिचंदा (ता. सुरगाणा) येथील मंगला बागूल ही महिला वाहून गेली.

- गोदावरीवर पूजेसाठी आलेला युवक वाहून गेला

- खानगावथडी येथे नांदूरमध्यमेश्‍वर पुलाला अडकली पाणवेली

- सावकी विठेवाडी (ता. देवळा) येथील गिरणा नदीवरील पूल पाण्याखाली

- दोन वर्षांपासून दूषित बाणगंगा पुराच्या पाण्याने प्रवाहित

धरणांमधील विसर्ग (क्यूसेस)

दारणा- २२९६६

भावली- १२१८

कडवा- ८२९८

भाम- ४३७०

पालखेड- ५५७०

गंगापूर- ४०००

नांदूरमध्यमेश्‍वर-४४७६८ (latest marathi news)

 first flood of this season
Nashik Monsoon News : जिल्ह्यात 355 मिलिमीटर पाऊस, तरी 713 गावांना टँकर! 4 धरणे ‘ओव्हरफ्लो’

महत्त्वाच्या धरणांमधील साठा (टक्के)

गंगापूर- ८०.७१

काश्‍यपी- ४४.७१

गौतमी गोदावरी- ७७.७३

आळंदी- ५५.२७

पालखेड- ७६.४४

करंजवण- ३७.४६

वाघाड- ५९.३०

ओझरखेड- ६.०१

पुणेगाव- ६९.८२

दारणा- ८६.५४

भावली- १००

मुकणे- ४७.०२

वालदेवी- ९७.७९

कडवा- ८९.८७

नांदूरमध्यमेश्‍वर- १००

भोजापूर- ६८.१४

चणकापूर- ७४.८२

हरणबारी- ९०.३९

केळझर- ७६.६१

गिरणा- १६.९५

पुनंद- ४६.३२

माणिकपुंज- ००

सरासरी एकूण....... ६५.२३ टक्के

 first flood of this season
Nashik Monsoon : जिल्ह्यात आज ऑरेंज, उद्या यलो अलर्ट; पाऊस कायम राहिल्यास धरणातून आज विसर्ग

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

तालुका......जून-जुलै.......१ ते ४ ऑगस्ट

मालेगाव.....२९४.६..........१७.१

बागलाण.....२९०.६..........४६.५

कळवण.......२५५.१..........८९.१

नांदगाव.......२९२.०..........२४.२

सुरगाणा.......७५२.६..........२५६.७

नाशिक........२२४.४...........८२.६

दिंडोरी..........४४७.३...........६७.८

इगतपुरी........८५४.२...........१७४.१

पेठ...............७७२.०...........२४७.०

निफाड...........२५२.६..........३३.३

सिन्नर.............२८९.४..........३५.५

येवला.............२८७.३..........१६.८

चांदवड............३६२.४..........६९.२

त्र्यंबकेश्‍वर.........११९७.९........१७५.५

देवळा..............३१०.८..........४५.३

एकूण..............४०४.१...........७२.०

 first flood of this season
Nashik Monsoon Rain Update : गंगापूर धरण 66 टक्के भरले, श्रावणात पाण्याचा विसर्ग! 78 टक्के भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी

पाऊस कसा मोजतात?

एखाद्या ठिकाणी पडणारा पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक वापरले जाते. सर्व देशांमध्ये, हवामान खाते पावसाची नोंद ठेवण्यासाठी याचा वापर करून पावसाची नोंद ठेवते. पाऊस मुख्यत: इंच किंवा मिलिमीटरमध्ये मोजला जातो. पर्जन्यमापकावर स्केल बसवलेली काचेची बाटली एका दंडगोलाकार लोखंडी पेटीत ठेवली जाते.

बाटलीच्या तोंडावर एक फनेल ठेवली जाते. फनेलचा व्यास बाटलीच्या व्यासाच्या दहापट आहे. ते मोकळ्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते. पावसाच्या पाण्याचे थेंब फनेलमध्ये पडत राहतात. बाटलीत पाणी साचत राहते. २४ तासांनंतर हवामान खात्याचे कर्मचारी येतात आणि बाटलीत साठलेले पाणी त्यावर बसवलेल्या स्केलच्या सहाय्याने मोजतात.

 first flood of this season
Nashik Monsoon Rain Update : पालखेड पाठोपाठ पुणेगांव धरण 80 टक्के भरले; धरणातून विसर्ग सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.