SAKAL Exclusive : गोदावरी, नंदिनीच्या नवीन पूररेषा निश्‍चितीचा ‘डाव’; जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी

Nashik News : २००९ मध्ये गोदावरी, नंदिनीसह उपनद्यांना मोठा पुर आल्यानंतर पाटबंधारे विभागाने पूररेषा आखण्याचा निर्णय घेतला.
Godavari river
Godavari riveresakal
Updated on

Nashik News : महापालिकेतील प्रशासकीय कार्यकाळ व येत्या काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने त्याचा फायदा घेत पूररेषेमुळे बाधित झालेल्या मिळकतधारकांच्या मिळकती पूररेषेच्या कचाट्यातून मोकळ्या करण्यासाठी काहींनी सुपारी बहाद्दर नेमले आहे. (Nashik News)

त्यांच्यामार्फत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेत प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा व पुढे महापालिकेने जलसंपदा विभागाला नव्याने पूररेषा निश्‍चित करण्याचा प्रस्ताव पाठवायचा असा डाव आहे. पुढे शासनाकडून पूररेषा नव्याने आखण्याचे आदेश काढल्यानंतर पूररेषेतील ॲमेनिटीज स्पेस मोकळ्या करून मालमत्तेला करोडो रुपयांचा भाव घ्यायचा असे उद्योग सुरू आहे.

२००९ मध्ये गोदावरी, नंदिनीसह उपनद्यांना मोठा पुर आल्यानंतर पाटबंधारे विभागाने पूररेषा आखण्याचा निर्णय घेतला. गोदावरी, नंदिनी तसेच अन्य उपनद्यांच्या दोन्ही तीरावर लाल व निळ्या रंगाची पूररेषा आखण्यात आल्याने दोन्ही किनाऱ्यावरील हजारो मालमत्ता बाधित झाल्या. पूररेषा टाकण्यात आल्याने त्या रेषेच्या आत किंवा ठराविक अंतर सोडून बांधकामे करता येत नाही. त्याशिवाय पुनर्विकासदेखील करता येत नाही.

महापालिकेने स्टील्ट बांधकामे करण्यास परवानगी दिली असली तरी यापूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधकामे केल्याने आता खर्च परवडत नाही. पाटबंधारे विभागाने आखलेली पूररेषा चुकीची असल्याची भूमिका महापालिकेची असून नवीन पूररेषा आखण्याची मागणी आहे. परंतु जलसंपदा विभागाकडून पूररेषा योग्यरीतीने व नियमात आखण्यात आल्याचा दावा आहे. (latest marathi news)

Godavari river
Nashik Officers Fake Proof : मरकडने दिलेले पुरावेही बनावट! राज्यसेवा आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

लोकप्रतिनिधींकडून अनेकदा महासभेत पूररेषेचा विषय चर्चेला आणून ती बदलण्याचा प्रयत्न झाला. परंतु, जलसंपदा शिवाय पूररेषा कोणीच आखू शकतं नसल्याने महापालिकेचा नाइलाज झाला. नवीन पूररेषा निश्‍चित करण्याची कुठलीच चिन्हे दिसतं नसल्याने मध्यंतरी विविध कारणे दाखवून पूररेषा कमी करण्याचे प्रयत्न झाले.

गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीची पूररेषा कमी करण्यात आल्याचे उदाहरणे सापडली. नंदिनी नदीची लांबी १४ किलोमीटर असून, २००६ पूर्वी नदीवर मोठ्या प्रमाणात पूल व बंधारे होते. पाटबंधारे खात्याने पूररेषा निश्‍चित केली. त्यानंतर नदीवरील छोटे पूल व बंधारे काढून ते मोठे केल्याने नदीला पूर येण्याचे प्रमाण कमी झाले.

सातपूर गावातील दोन किलोमीटर भागात पूररेषा कमी करण्यात आली. काही बांधकाम व्यावसायिकांनी डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार केला गेला. त्यामुळे पूररेषेच्या कचाट्यातून तेथील मिळकत सुटली आहे. पुढे अशाच प्रकारे गोदावरी नदीच्या जवळपास आनंदवली,गंगापूर भागाकडून पूररेषा कमी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.

Godavari river
Nashik Crop Loan : आदिवासी शेतकऱ्यांच्या पीककर्ज माफीचा प्रस्ताव द्या! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार

मिळकती मोकळ्या करण्याचा प्रयत्न

गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने लाल व निळी पूररेषा आखली आहे. या पूररेषेमुळे २०१० पासून बाधित मिळकतींचा विकास थांबला. जवळपास बाराशे कोटींची मालमत्ता अडकली. शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करता येणार नाही. इमारतींचा पुनर्विकासदेखील करता येणार नाही. त्यामुळे नंदिनी पॅटर्न वापरून पूररेषा कमी करण्याचा घाट घातला गेला.

त्यात काही प्रमाणात यशदेखील मिळाले. आता आनंदवली, चांदशी, गंगापूर गाव, फॉरेस्ट नर्सरी त्यानंतर बापू पूल येथे दोन नवीन पूल गोदावरी नदीवर तयार होत असल्याने मिळकती व जमिनींना रिअल इस्टेट मार्केटमध्ये वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन संपूर्ण पूररेषाच नवीन आखण्यासाठी काही ठराविक व्यावसायिक सरसावले आहे. नवीन पूररेषा निश्‍चितीचे आदेश आल्यानंतर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील पूररेषेतील मिळकती यातून मोकळ्या करण्याचा प्रयत्न आहे.

Godavari river
Nashik Slum News : निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टी पुनर्वसनाचे आश्‍वासन; शासकीय जागा मिळण्यात अडचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.