चांदोरी : भारतातील दक्षिणवाहिनी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची ओळख देवनदी म्हणून आहे. संथ वाहत काठावरील शेती-वाडी हिरवीगार करीत वाटचाल सुरू असली तरी महानगरपालिका व गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्याने प्रदूषित नदी वाहत आहे. गोदावरीचे पावित्र्य राखले न गेल्यास भविष्यात त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहे. (Godavari river flowing with sewage Neglect of NMC)