Blue Tea Benefits: ग्रीन अन्‌ ब्लॅक टीच्या साथीला आता ब्लू टी! आरोग्यवर्धक चहा दिवसातून केव्हाही, कितीही वेळा घ्या

Health Care : आयुर्वेदिक ‘ब्लू टी’ बद्दल कधी ऐकले आहे का, ब्लू टी हा गोकर्ण नावाच्या वनस्पतींच्या फुलांपासून हा चहा बनविला जातो.
Blue Tea Benefits
Blue Tea Benefitsesakal
Updated on

Blue Tea Benefits : कधीकाळी चहाच्या दुकानात एकच प्रकारचा चहा मिळायचा पण, आता वाढत्या आजारांमुळे म्हणा किंवा हेल्थ कॉन्शियन्स लोकांची संख्या वाढल्याने ‘लेमन टी’, विदाऊट शुगर ब्लॅक टी’, ‘ग्रीन टी’ यासारखे पर्याय चहाच्या दुकानांमध्ये दिसतात. पण आयुर्वेदिक ‘ब्लू टी’ बद्दल कधी ऐकले आहे का, ब्लू टी हा गोकर्ण. (Blue Tea Benefits) त्याला अपराजिता, शंखपुष्पी, नीलकंठ असे म्हटले जाते. त्या नावाच्या वनस्पतींच्या फुलांपासून हा चहा बनविला जातो. (nashik gokarna blue tea health care marathi news)

अमेरिका, मलेशिया आणि थायलंडमध्ये, असे पेय आधीपासून अस्तित्वात आहे पण भारतात ‘ब्लू टी’ बद्दल फारशी जागृती नाही. ब्ल टू गरम, थंड पाण्यात दोन्ही प्रकारे घेता येतो. गरम पाण्यात टी बॅग टाकल्यावर ब्लू टी तयार होतो. आवश्यक असल्यास मध वा साखर चहात घालता येते.

या चहात कॅफिन नसल्याने दिवसातून कितीही वेळा, कोणत्याही वेळी घेता येतो. यामध्ये आलं, वेलदोडा, गुलाब, लिंबू, पुदिना सारखे अनेक फ्लेवर मिळतात तसेच हा चहा फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळतो. या निळ्या रंगाच्या चहाचे अनेक फायदे आहेत.

हा चहा चवीला अजिबात कडू लागत नाही. उलट चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असल्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात. मधुमेह ग्रस्त रुग्णांची साखर नियंत्रणात राहते. त्वचा आणि वजन कमी करण्यासाठी ब्लू टी फायद्याचा ठरतो. स्मरणशक्ती, पचनशक्ती सुधारते.

ब्लू टीमध्ये लिंबू घातल्यानंतर गुलाबी रंगाचा चहा तयार होतो. ब्लू टीची भारतातील प्रत्येक शहरात ऑनलाइन डिलिव्हरी मिळते. जगातील १२ देशांमध्ये ब्लू टीची ऑनलाइन विक्री होते पैकी ८० टक्के परदेशात तर भारतात २० टक्के विक्री होते. (Latest Marathi News)

Blue Tea Benefits
International Tea Day 2024 : गवती चहामुळे होईल ताण-तणावाची सुट्टी ! जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गोकर्णाचे फूल विविध रंगाचे

गोकर्ण हा एक वेल असतो. वेलीवरचे फूल तोडले नाही तर, त्याची गवारीच्या भाजीसारखी शेंग येते. वाळलेल्या शेंगांच्या बी कुंडीत, जमिनीत लावता येते. गोकर्णाचे फूल विविध रंगाचे सुद्धा येतात. गाईच्या कानाच्या आकारासारखे गोकर्णचे फूल असल्याने त्याला गोकर्ण असे म्हटले जाते. बाजारात सामान्य चहाची किंमत १०० ग्रॅम १०० रुपये, ग्रीन टीची १०० ग्रॅम २०० रुपये तर ब्लू टी ३० टी बॅग ३७० रुपयांना मिळतात.

"आयुर्वेदानुसार ब्लू टी हा कफ वाढू न देणारा, वातनाशक, पित्तनाशक म्हणजे पित्ताचे शमन करणारा आहे. उन्हाळ्यात ब्लू टी घेताना दालचिनीचे तुकडा टाकून क्षणभर झाकून ठेवावा, पावसाळ्यात आल्याचा तुकडा तर लहान मुलांसाठी देताना अक्रोड घालावा. मुलांच्या बुध्दीवर्धनासाठी फायदेशीर ठरतो."-वैद्य विक्रांत जाधव

Blue Tea Benefits
Turmeric Water Benefits : आरोग्यासाठी बहुगुणी आहे हळदीचे पाणी, रोज सकाळी प्यायल्याने मिळतील ‘हे’ फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.