Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्यांना सश्रम कारावासाची शिक्षा; मोक्का न्यायालयाचा निकाल

Nashik Crime : मोक्का न्यायालयाने तिघांना ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ लाख २५ हजार याप्रमाणे ४५ लाख ७५ हजारांचा दंडही ठोठावला आहे.
Court Order
Court Orderesakal
Updated on

नाशिक : आडगाव हद्दीतील लॉन्ससमोरून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणार्या अट्टल सोनसाखळी चोरट्यांविरोधात मकोकांतर्गत जबरी चोरीच्या गुन्ह्यात विशेष मोक्का न्यायालयाने तिघांना ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ लाख २५ हजार याप्रमाणे ४५ लाख ७५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. सोमनात हिरामण बर्वे (३०, रा. मुंगसरा रोड, चांदशी, नाशिक), नितीन जिवाजी पारधे (२५, रा. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी), अनिल भावराव पवार (२५, रा. सय्यद पिंप्री, नाशिक) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.