सिडको : भाऊबीजेच्या पवित्र सणाला एका महिलेच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता होती. मात्र, नाशिक महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि कर्तव्यदक्षतेमुळे हरवलेली ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी चक्क कचऱ्याच्या ढिगातून शोधून काढली. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. तसेच सणासुदीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २८ मधील साईबाबा संकुल, कार्तिकेय नगर, कामटवाडे येथील हेमांगी कुमावत यांनी भाऊबीजनिमित्त ओवाळणी केल्यानंतर ताटातील फुले घंटागाडी (क्रमांक एम.एम.१५, एच.एच. ७९७४) मध्ये टाकली. (Gold ring recovered from garbage heap appreciated by search mission officer )