Server Down : सर्व्हरडाऊनचा शासकीय कार्यालयाला फटका; पंचवटी विभागीय कार्यालयातून दाखले मिळण्यास विलंब

Server Down : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगवान डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वत्र होत असताना या तंत्रज्ञानात बिघाड झाल्यास कामे ठप्प होत आहेत.
NMC
NMC esakal
Updated on

Server Down : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगवान डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वत्र होत असताना या तंत्रज्ञानात बिघाड झाल्यास कामे ठप्प होत आहेत. असाच काहीसा अनुभव पंचवटीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना येत आहे. कार्यालयात महिन्याभरापासून सर्व्हरडाऊनची समस्या होत असल्याने जन्म व मृत्यूचे दाखल देण्यासह इतर कामांना विलंब होत आहे. (government office delay in getting documents due to Server down from Panchavati divisional office )

तसेच सोमवारी (ता. २२) रोजी या कार्यालयातील इंटरनेट सेवा खंडित झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी आदींच्या बिलांच्या भरण्याचे कामही ठप्प झाले होते. पंचवटी विभागीय कार्यालयात सोमवारी विविध बिले भरण्यासाठी नागरिक आले असताना त्यांना येथील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे बिले न भरताच परत माघारी फिरण्याची वेळ आली. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या बिलांचा भरणा बंद करण्यात आला होता.

कार्यालयातील काऊंटरवर तसे फलक लावण्यात आले होते. पंचवटी परिसरातील विविध भागातून बिलांचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिक इंटरनेट सुरु होण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळ थांबून होती. काही परत माघारी फिरले तर काही थांबून होते. महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून इंटरनेटचा वापर करून कामकाज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या इंटरनेटचा डाटा संपल्यानंतर पुन्हा ही यंत्रणा ठप्प होत होती. (latest marathi news)

NMC
SAKAL Exclusive : निधी वितरणाच्या आयपास प्रणालीत Server Downचा खो!

जन्म व मृत्यूंचे दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही सर्व्हर डाऊन असल्याने दाखल्यांचे अर्ज घेण्याचे काम तसेच दाखले तयार करण्याचे काम ठप्प झाल्याने नागरिकांना ताटकाळत बसून राहण्याची वेळ आली. एका बाजूला कामांना गती यावी, वेळेत कामे व्हावीत म्हणून आधुनिक तंत्राज्ञानाचा वापर होत असताना अशा प्रकारे होणाऱ्या तांत्रिक बिघाडाने अडचणी निर्माण होत असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

''जन्म व मृत्यूचे दाखले देण्यासाठी जी प्रणाली राबविण्यात येते ती आता केंद्राकडून अपडेट करण्यात आलेली आहे. त्यानुसार हे दाखल मिळण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे. नागरिकांकडून दाखल्यांसाठी अर्ज आल्यानंतर ते ऑनलाइनने जिल्हा परिषदेकडे पाठविली जातात. तेथून ते महापालिकेच्या कार्यालयात येतात. ही व्यवस्था करण्यात आल्यापासून दाखल मिळण्याचा कालावधी वाढला आहे. त्यात सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांना वेळेवर दाखले देणे शक्य होत नाही.''- मदन हरिश्चंद्र, पंचवटी विभागीय अधिकारी

NMC
Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाऊन, फेसबुक-इन्स्टावरही हजारो वापरकर्त्यांना येतेय अडचण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.