नाशिक : रस्त्यांची दुर्दशा, अस्वच्छता, ड्रेनेज सिस्टीमचा अभाव आणि एमडी ड्रग्जचे होणारे उत्पादन या सर्व प्रकरणांवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका, जिल्हा व पोलिस प्रशासनाला स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना केल्या. शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. ९) वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. (Governor displeasure about road conditions drugs)