Nashik News : शासकीय ITI ला महापुरुषांची नावे! सहा संस्थांचे नामकरण; सातपूर आयटीआयला सावरकरांचे नाव

Latest Nashik News : सातपूर ‘आयटीआय’ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले आहे. येवला, कळवण, पेठ व सुरगाणा येथील आयटीआयची नावेही बदलली आहेत.
ITI
ITIesakal
Updated on

Nashik News : राज्य सरकारने राज्यातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना महापुरुषांची नावे दिले असून, नाशिक जिल्ह्यातील सहा संस्थांचे नामकरण झाले आहे. सातपूर ‘आयटीआय’ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले आहे. येवला, कळवण, पेठ व सुरगाणा येथील आयटीआयची नावेही बदलली आहेत. (Govt ITI names of great leaders)

राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी (ता. ८) राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण केले. यात सातपूर आयटीआयला स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव दिले आहे.

याविषयी मंत्री लोढा म्हणाले, की औद्योगिक संस्थांचे नामकरण केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात फक्त दोनच संस्थांचे नामकरण यापूर्वी झाले होते. (latest marathi news)

ITI
Nashik Police : अतिसंवेदनशील परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला! निवडणुकीसाठी सज्जता; धार्मिकस्थळांच्या सुरक्षिततेवर भर

नामकरण झालेले आयटीआय

-महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला

-स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक

-(कै.) ए. टी. पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कळवण

-नाशिकमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महिला संस्थेला संत मीराबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले

-आवारी गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पेठ

-क्रांतिकारक भागोजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), सुरगाणा

ITI
Nashik News : जलजीवन मिशनचा अहवाल सादर करा! ‘दिशा’ समितीच्या बैठकीत सूचना; गैरहजर अधिकाऱ्यांचे टोचले कान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.