Nashik NMC News : शासनाला 14 वर्षानंतर जाग! कोल्हापूरचा निधी नाशिककडे वळविल्याचे आले लक्षात

Latest Nashik News : २००८ मध्ये नाशिक महापालिकेला जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पावसाळी गटारी योजना राबविण्यासाठी जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.
NMC Nashik
NMC Nashik esakal
Updated on

Nashik NMC News : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पावसाळी गटारी योजनेसाठी शासनाने दिलेल्या निधीपैकी सहा कोटी ७६ लाख रुपये कोल्हापूर महापालिकेचा निधी चुकून नाशिक महापालिकेला अतिरिक्त देण्यात आल्याचे १४ वर्षानंतर लक्षात आले.

त्यानंतर महापालिकेला पत्र पाठवून तातडीने निधी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने खर्चाची जुळवाजुळव करत अखेर शासनाकडे निधी वर्ग केला आहे. (noticed that funds of Kolhapur been diverted to NMC)

२००८ मध्ये नाशिक महापालिकेला जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पावसाळी गटारी योजना राबविण्यासाठी जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून शहरात जवळपास ८७ किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारी टाकण्यात आल्या.

संपूर्ण निधी खर्च झाल्यानंतर राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाने महापालिकेला पत्र पाठवत पावसाळी गटारी योजनेसाठी सहा कोटी ७६ लाख रुपयांचा निधी अतिरिक्त दिल्याचा दावा केला. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेनेदेखील हा निधी अतिरिक्त दिला की नाही, याची शहानिशा न करता अतिरिक्त ठरविलेला ६.७६ कोटींचा निधी कोल्हापूर महापालिकेच्या थेट पाइपलाइन योजनेसाठी नगरपरिषद संचलनायाकडे वर्ग केला. (latest marathi news)

NMC Nashik
Dharwad Bench : 'ती' 25 एकर जमीन मूळ मालकांकडेच राहणार; न्यायालयाने फेटाळली बुडाची याचिका

लेखा विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार पावसाळी गटार योजनेच्या शीर्षकाखाली एक कोटी ८० लाख रुपये निधी शिल्लक होता. उर्वरित ४.९६ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या हिशापोटी तरतूद करण्यात आलेल्या निधीतून वर्ग करण्यात आला. महासभेत या विषयाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे.

"राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाने महापालिकेला पावसाळी गटार योजनेतील अतिरिक्त ६.७६ कोटींचा निधी वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महासभेत प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली."

- संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, महापालिका.

NMC Nashik
RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात! कार्यालयात शुकशुकाट; परवानाधारकांचे निरीक्षकांकडून कामकाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.