Nashik News : जीपीओ टपाल कार्यालयाची वाट बिकट; दोन्ही प्रवेशद्वारांवर खड्ड्यांचे साम्राज्य

Nashik : जीपीओ अर्थात मुख्य टपाल कार्यालयाची वाट नागरिकांसाठी बिकट झाली आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
A woman entering the office wading through muddy water on the road at the GPO Post Office
A woman entering the office wading through muddy water on the road at the GPO Post Officeesakal
Updated on

Nashik News : जीपीओ अर्थात मुख्य टपाल कार्यालयाची वाट नागरिकांसाठी बिकट झाली आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पावसाच्या पाण्याने चिखल होऊन पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. नेहमीची समस्या असूनही रस्त्याचे नूतनीकरण होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्र्यंबक रोडवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात टपाल विभागाचे जीपीओ टपाल कार्यालय आहे. ()

मुख्य टपाल कार्यालय असल्याने शहरातील नागरिक विविध कामानिमित्त येतात. इतकेच नाही तर इंडियन पोस्ट बँकदेखील कार्यालयाच्या आवारात असल्याने तेथेही ग्राहकांची ये-जा असते. दैनंदिन शेकडो नागरिकांची येत-जात असतात. त्यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी याच मार्गाचा अवलंब करत आहे. असे असताना कार्यालयाची वाट बिकट झाली आहे. सध्या दोन्ही प्रवेशद्वारावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. (latest marathi news)

A woman entering the office wading through muddy water on the road at the GPO Post Office
Nashik News : परस बागेसाठी फळ, फूल रोपांना पसंती; पावसाच्या आगमनानंतर विक्री जोमाने

शिवाय माती पडून असल्याने त्यात पावसाचे पाणी साचले आहे. सर्वत्र चिखल पसरला आहे. नागरिकांना चिखल आणि पाणी तुडवत आत प्रवेश करावा लागत आहे. एटीएमजवळील पार्किंगच्या शेडमध्येही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखल पाण्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन बकाल स्वरूप आले आहे. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे.

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदाच अशा प्रकारची परिस्थिती आहे असे नाही. तर दरवर्षी अशाच प्रकारे पावसाने चिखल पाण्याचे साम्राज्य पसरते. असे असतानाही कित्येक वर्षांपासून या ठिकाणी रस्ता तयार केलेला नाही. ग्राहकांना येणाऱ्या अडचणींकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

A woman entering the office wading through muddy water on the road at the GPO Post Office
Nashik News : ग्रामसेवक संघटनांची रोखलेल्या वेतनासाठी प्रशासनाकडे धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.