Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागलं आहे. हा मतदारसंघ २००९ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण त्यात तांबे परिवाराचा फार मोठा वाटा आहे.
त्यातच सत्यजीत तांबे यांची प्रतिमा तरुणाईच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघणारा नेता, अशी असल्याने या मतदारसंघात सत्यजीत यांचीच सध्या चर्चा सर्वाधिक आहे. 'भारत जोडो' यात्रेदरम्यान सत्यजीत यांची अनेक तरुणांनी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता.
आता तर नाशिकमधील अनेक तरुण व्हॉट्सअपवर तांबे यांचे फोटो ठेवून त्यांना समर्थन देत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सध्या सत्यजीत तांबे यांची आगेकूच असल्याचं चित्र आहे. (Nashik Graduate Constituency Leader Satyajeet Tambe sensitive to issue of youth congress bjp nashik political news)
नाशिक पदवीधर मतदारसंघात २००९ पासून सत्यजीत यांचे वडील डॉ. सुधीर तांबे निवडून येत आहेत. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यानंतरच्या सर्व निवडणुका काँग्रेसकडून लढवत त्यांनी हा बालेकिल्ला मजबूत केला आहे.
त्यांच्या मताधिक्याबाबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही अचंबा वाटतो. नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये डॉ. तांबे आणि इतर तांबे परिवार यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
त्यातच ही निवडणूक आपल्याऐवजी आपल्या मुलाने म्हणजेच सत्यजीत यांनी लढवावी, अशी डॉ. तांबे यांचीही इच्छा होती. त्यामुळे तांबे कुटुंबीय आणि इतर परिवार यांचा पाठिंबाही सत्यजीत यांनाच आहे.
सत्यजीत स्वत: गेली २२ वर्षं राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. २००७ ते २०१७ इतक्या प्रदीर्घ काळ त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे. बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, शहरीकरणातील समस्या आणि त्यांचं निराकारण अशा तरुणाईच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर पोटतिडीकीने बोलणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
त्यातच त्यांनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेलं कामही लोकांच्या समोर आहे.
लॉकडाऊनच्या काळापासून सत्यजीत तांबे यांनी फेसबुक लाईव्ह व इतर तंत्रस्नेही माध्यमांद्वारे तरुणांशी सतत संपर्क साधला होता. ते अजूनही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये, विविध व्यासपीठांवर तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यापासूनच प्रेरक भाषणं देण्यापर्यंत अनेक मार्गांनी तरुणांच्या संपर्कात असतात.
त्यामुळे तरुणांनाही सत्यजीत एखाद्या मोठ्या भावाप्रमाणेच भासतात. नेमक्या याच भावनेतून सत्यजीत यांना पाठिंबा देण्यासाठी तरुणांनी विविध मार्गांचा अवलंब केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील तरुण मतदारांनी आपल्या व्हॉट्सअपवर सत्यजीत यांचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.
तसंच अनेक जणांनी फेसबुक पोस्ट करूनही सत्यजीत यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या सत्यजीत यांच्यामुळे ही लढत चुरशीची होणार, असा अंदाज नाशिकमधील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.