Shubhangi Patil Profile : सत्यजीत तांबेंची धडधड वाढवणाऱ्या शुभांगी पाटील कोण?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच अनेक ट्विस्ट येत आहेत.
Shubhangi Patil
Shubhangi Patil Sakal
Updated on

Nashik Graduates Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच अनेक ट्विस्ट येत आहेत. सत्यजीत तांबेंच्या अपक्ष उमेदवारीनंतर आता ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

Shubhangi Patil
Air India Urination Case : विमानातील लघुशंका प्रकरणात महुआ मोईत्रांची मोठी मागणी

कोण आहेत शुभांगी पाटील?

  • शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.

  • त्या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

  • या शिवाय त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.

Shubhangi Patil
Devendra Fadanvis : फडणवीसांनी घेतला पुणे पोलिसांचा क्लास; म्हणाले, ड्रग्जविरोधात मोठी...
  • तसेच पाटील या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.

  • नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत.

  • याशिवा शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

Shubhangi Patil
Siddharth Sharma Demise : क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! रणजी खेळाडूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन

शुंभागी पाटील काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये होत्या. शिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार हे दिसताच, शुंभागी पाटील यांनी मातोश्रीसोबत संपर्क साधला. तसेच ठाकरे गटाने त्यांना उमेदवारीही दिली.

महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आली असून शुभांगी पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील थेट तीन उमेदवारांमध्ये असणार आहे.

Shubhangi Patil
Fadnais on Satyajeet Tambe: "सत्यजीत तांबेंचं काम चांगलं, योग्यवेळी निर्णय घेऊ"; फडणवीसांनी तापवलं वातावरण

काँग्रेसकडून या जागेसाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेऊन काँग्रेसला धक्का दिला. तसेच त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र काँग्रेसने सत्यजीत यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे सत्यजीत तांबे यांचा मार्ग खडतर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.