Nashik News : ग्रामसेवक संघटनांची रोखलेल्या वेतनासाठी प्रशासनाकडे धाव

Nashik : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गत महिन्यात असहकार आंदोलनाची हाक दिली होती.
wages
wagesesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गत महिन्यात असहकार आंदोलनाची हाक दिली होती. प्रशासनाविरुद्ध झालेल्या या आंदोलनामुळे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे वेतन रोखण्यात आले आहे. जून २०२४ महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी ग्रामसेवक युनियन व कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनांनी सोमवारी (ता. १५) प्रशासनाकडे धाव घेत तत्काळ वेतन देण्याची मागणी केली आहे. (Gram sevak organizations go to administration for withheld wages)

ग्रामसेवकांच्या दहा ते वीस वर्षांपासून जिल्हास्तरावर अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्या सोडविण्यात याव्यात, पदोन्नतीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे, तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात अनेक फायली पडून असून, त्या मार्गी लावाव्यात यांसह विविध १७ प्रलंबित मागण्यांसाठी गत महिन्यात जिल्ह्यातील ग्रामसेवक युनियनने असहकार आंदोलनाची हाक दिली होती. या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी ग्रामसेवकांच्या सर्व संघटनांची एकत्रित बैठक प्रशासनाने घेतली होती.

यात सर्व मागण्या महिनाभरात सोडविल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले. मात्र ग्रामसेवक युनियनने असहकार आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला व आंदोलन सुरू ठेवले. कृषी पदवीधरण तांत्रिक ग्रामसेवक, आदिवासी ग्रामसेवक या संघटनांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने असहकार आंदोलनातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे ग्रामसेवक युनियन अंतर्गत ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू होते. (latest marathi news)

wages
Nashik ZP News : जि. प. निधी नियोजनासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम

यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी या आंदोलनावर मध्यस्ती करत बैठक घेतली. यात तोडगा निघाल्याने ग्रामसेवक युनियनने देखील असहकार आंदोलन मागे घेतले. मात्र, प्रशासनाचे आदेश धुडकावित आंदोलन केल्याने प्रशासनाने ग्रामसेवकांचे विनावेतन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन कालावधीतील ग्रामसेवकांचे वेतन रोखण्यात आले आहे.

त्यामुळे दोन्ही ग्रामसेवक संघटनांनी सोमवारी (ता. १५) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात जूनअखेरचे वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे वेतन थांबवू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे, जिल्हा सरचिटणीस संजय गिरी, तसेच तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे, कोषाध्यक्ष विनोद अहिरे, सचिव माया मोढे आदी उपस्थित होते.

wages
Nashik News : भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी! पोलिस अधिक्षकांच्या आदेशाची पायमल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.