Nashik News : आता ग्रामसेवक संघटनांमध्ये जुंपली! फूट पडली नसल्याचा ग्रामसेवक युनियनचा दावा, केवळ चौघांचे राजीनामे

Nashik : असहकार आंदोलनाची हाक या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक युनियनमध्ये उभी फूट पडल्यावर आता ग्रामसेवकांच्या संघटनांमध्ये जुंपली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकाची झालेल्या कार्यमुक्ती, ग्रामसेवक संघटनेने प्रलंबित प्रश्नांबाबत दिलेली असहकार आंदोलनाची हाक या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक युनियनमध्ये उभी फूट पडल्यावर आता ग्रामसेवकांच्या संघटनांमध्ये जुंपली असल्याचे पाहावयास मिळत आहे. फूट पडल्याचा दावा ग्रामसेवक युनियन संघटनेने फेटाळून लावला असून, संघटनेतील तीन ते चार सभासदांनी राजीनामा दिला. (Gram Sevak Union claims that now there is no split in Gram Sevak organization)

त्यामुळे ती फूट नसून, राजीनामा असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे, युनियन संघटनेतून अनेक ग्रामसेवक बाहेर पडल्याचे तांत्रिक ग्रामसेवक संघटनेकडून सांगण्यात येते. ग्रामसेवक हा गाव सांभाळणारा महत्त्वाचा घटक आहे. या ग्रामसेवकांची संघटना असून, ते ग्रामसेवकांच्या प्रश्नांसाठी काम करीत आहेत. मात्र, आता संघटनांमधील वाद उफाळून आला असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकाची तडकाफडकी झालेली कार्यमुक्ती आणि प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामसेवक संघटनेने दिलेली असहकार आंदोलनाची हाक या घटनांचे पडसाद ग्रामसेवक संघटनेत उमटले. ग्रामसेवक युनियन संघटनेतून रवींद्र ठाकरे, विनोद आहिरे, माया मोढे यांनी बाहेर पडत तांत्रिक ग्रामसेवक संघटनेशी संलग्न झाल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik News : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता काँग्रेस मांडणार शासनदरबारी

त्यामुळे ग्रामसेवक संघटनेत फूट पडल्याचे बोलले जाते. परंतु, ग्रामसेवक युनियनने फूट पडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी (ता. ३०) माया उत्तम मोढे, रवींद्र बाबूराव ठाकरे, संजय हिलाल बाविस्कर या तिघांनी संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ई-मेलद्वारे पाठविला आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी नाही. त्या व्यतिरिक्त एकही सभासदाचा राजीनामा प्राप्त झालेला नाही.

त्यामुळे नाशिक जिल्हा ग्रामसेवक संघटना डीएनए १३६ मध्ये फूट पडली नसल्याचे संघटनेचे सरचिटणीस संजय गिरी यांनी संघटनेतर्फे सांगितले. तर, ग्रामसेवक युनियनच्या कारभारात निवृत्त ग्रामसेवकाच्या हस्तक्षेपाला कंटाळून अनेक ग्रामसेवक संघटनेतून बाहेर पडत आहेत. हे ग्रामसेवक तांत्रिक ग्रामसेवक संघटनेशी जोडले जात असल्याचे तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे कोशाध्यक्ष विनोद आहिरे यांनी सांगितले.

Nashik ZP
Nashik News : विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम; राधाकृष्ण गमे निवृत्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.