Nashik Heavy Rain: द्राक्ष, सोयाबीन मका गेला पाण्यात! परतीच्या पावसाच्या तडाख्याने खरिपाच्या उत्पन्नावर पाणी, द्राक्षही संकटात

Latest Nashik Heavy Rain News : द्राक्षशेतीचे नियोजन कोलमडले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून भरपाई द्यावी, अशी मागणी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Water accumulated in a rain-pruned vineyard
Water accumulated in a rain-pruned vineyardesakal
Updated on

निफाड : तालुक्यात परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके वाया गेली आहे. द्राक्षशेतीचे नियोजन कोलमडले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून भरपाई द्यावी, अशी मागणी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (Grapes Soybeans Maize destroyed by rains)

यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करीत पिके वाचविली. आता पिके हातात येत असतानाच परतीच्या पावसाने धिंगाणा घातला. ऐन सोंगणीची कामे सुरू असताना कोसळणाऱ्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले आहे.

द्राक्षपंढरीचे अर्थकारण काळवंडले आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याच्या मार्गावर आहे. रविवारी पश्चिम आणि उत्तर पट्यात झालेल्या धुव्वाधार पावसान होत्याच नव्हते केले आहे. जवळपास तीस हजार एकर द्राक्षबागात पावसाच्या उघडीपीनंतर कामे जोर धरू लागलेली असतानाच आलेल्या पावसामुळे पोंग्यात असणारी, पोंग्याच्या बाहेरची छाटलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे.

सध्या द्राक्षबागांच्या फळबहार छाटणीचा काळ सुरु आहे, त्यातच अतिवृष्टीमुळे फळबहार छाटणी व मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. नविन फुटवा होत असलेल्या द्राक्षबागेच्या कोवळ्या फुटी तुटफुट होऊन नुकसान होत आहे. तसेच बुरशीजन्य रोगांचा मारा होत आहे. त्यामुळे चिखलात फवारणीचा ट्रँक्टर चालविणेदेखील जिकरीचे होत आहे. पावासान बागांवर फवारलेली महागडी ओषधे धुतली जात असल्यामुळे फवारणीचा खर्चही वाढला आहे

(latest marathi news)

Water accumulated in a rain-pruned vineyard
Nashik Heavy Rain : बागलाणमध्ये परतीच्या पावसाने दाणादाण! मदतीची माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी

"यंदाच्या हंगामात चांगली उत्पादनाची आशा असताना कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, मका पाण्यात गेला आहे. द्राक्ष छाटणीचे नियोजन कोलमडले आहे. छाटल्या गेलेल्या बागांना पेस्ट करता येत नसल्याने औषधी फवारली तर ती वाया जात आहे. भाजीपाला पिकांना चांगले भाव मिळत असतानाच पावसाने त्याही आशेवर पाणी फिरवले आहे."

- विकास रायते, खडकमाळेगाव.

"टोमॅटोची केवळ पानेच शिल्लक राहिली. पावसामुळे पाने कुजल्याने टोमॅटोचीदेखील वाढ होत नसल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. काढणीला आलेले सोयाबीन पूर्णतः सडण्याच्या मार्गावर आहे. मक्यात पाणी साचल्याने उभे पीक आडवे पडू लागले आहे. भाजीपाला पिकांचीदेखील तिच अवस्था झाली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देऊन दिलासा द्यावा."

- बाबूराव सानप, सोनेवाडी.

प्रमुख पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

सोयाबिन ः २३६०५

मका ः१२१७

भुईमूग ः १६३.५०

तृनधान्य ः १२३७.१०

कडधान्ये ः१५३.५०

गळीतधान्य ः २३७६८.५०

Water accumulated in a rain-pruned vineyard
Dhule Heavy Rain : कापडणे परिसरात सलग पाचव्या दिवशीही पाऊस! वादळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.