Nashik News : ओझरची स्मशानभूमीच मृत्यूशय्येवर! निवाराशेडच्या भूमीलगतचे लोखंडी पोलही सडले

Nashik News : ओझर येथील वीटभट्टीजवळील स्मशानभूमितील शवदाहिन्या जुनाट झाल्या असून, अनेक वर्षांच्या शवदाहिन्या कुजल्याने केव्हाही निखळून पडू शकतात.
Old Cemetery
Old Cemeteryesakal
Updated on

ओझर : येथील वीटभट्टीजवळील स्मशानभूमितील शवदाहिन्या जुनाट झाल्या असून, अनेक वर्षांच्या शवदाहिन्या कुजल्याने केव्हाही निखळून पडू शकतात. तर निवारा शेडचे लोखंडी पोल खालच्या बाजूला सडलेले आहेत. त्यामुळे त्वरीत नवीन पोल बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. (Nashik News)

येथील बाणगंगेच्या तीरावरील दक्षिण किनाऱ्यावर एक व वेशीबाहेर पाहुणा मारूती मंदिराशेजारील पुलाच्या पलिकडे वीटभट्टीवर वाडी वस्त्यावरील म्हणजे दक्षिण बाजूच्या रहिवाशांसाठी एक स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. गावातील मयत व्यक्तींवर अंतिम संस्कार मारूती वेशी जवळच्या स्मशानभूमीत होतो.

वीटभट्टीजवळ असणाऱ्या स्मशानभूमीच्या निवारा शेडचे लोखंडी पोल खालच्या बाजूने सडल्याने केव्हाही शेड पडू शकते किंवा एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेडचे त्वरीत नवीन पोल बसविण्याची मागणी माजी सरपंच हेमराज जाधव, माजी उपसरपंच धर्मेंद्र जाधव यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेजारील दुसऱ्या निवारा शेडवरचे पत्रे उडाले आहेत. तेथील शवदाहिन्यांचे पोल अनेक दिवसांपासून कुजले आहेत. जीर्ण झाल्याने शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांना भीती वाटते. पाण्याची टाकीची देखील दुरावस्था झाली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. बाणगंगा नदीवरील पूलावर खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. (latest marathi news)

Old Cemetery
Nashik Police: ॲकॅडमीच्या संचालकांना पोलिसांचा दणका! जल्लोष भोवला; दोघांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

"अनेक वर्षाच्या अंतिमसंस्काराच्या अग्निमुळे शवदाहिन्या जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत. महिला निवारा शेडवरील पत्रे नसल्याने सध्या पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांचे हाल होतात. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार होतात.

पावसाने परिसरात गवत वाढलेले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाने दुर्घटना होऊ शकते. यासाठी नगर परिषदेस दुरुस्तीचे निवेदन दिले आहे. कार्यवाही न झाल्यास नगर परिषदेसमोर आंदोलन छेडले जाईल." - हेमराज जाधव, माजी सरपंच, ओझर

Old Cemetery
Nashik ZP News : सुपर फिफ्टीच्या निधीसाठी ‘नियोजन’ला साकडे; जिल्हा परिषद प्रशासनाकडून 2 कोटींची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.