Sant Nivruttinath Palkhi : दिंडीत आदिवासी समाजाचा मोठा सहभाग; पालखी सोहळ्याच्या वैभवात भर

Nashik News : निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या ठिकठिकाणी सहभागी होत असतात, त्यापैकी आदिवासी भागांमधूनही अनेक दिंड्या वर्षानुवर्षे नाथांसोबत चालत आहेत.
Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Palkhiesakal

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यातून चालणाऱ्या वेगवेगळे उपक्रमांसह विविध समाजघटक सहभागी होत असतात. निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या ठिकठिकाणी सहभागी होत असतात, त्यापैकी आदिवासी भागांमधूनही अनेक दिंड्या वर्षानुवर्षे नाथांसोबत चालत आहेत. (Nashik Greater involvement of tribal community in Sant Nivruttinath Dindi)

आदिवासी भागामध्ये वारकरी संप्रदायाचे तनामनाने काम करणारे (कै.) बापूबाबा देवरगावकर हे त्यापैकीच एक. बापूबाबांना जाऊन अनेक वर्षे झाली. परंतु आदिवासी भागांमध्ये त्यांनी रुजवलेलं वारकरी संप्रदायाचे काम आजही अनेक माणसे नेटाने सांभाळत आहेत. आदिवासींचा दिंडी सोहळा निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात परंपरेप्रमाणे चालत आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळे सण-उत्सव आदिवासी सांस्कृतिक परंपरेप्रमाणे चालत असतात.

मग दिवाळी असो, दसरा असो किंवा अन्य एखादा उत्सव असो त्यात गायली जाणारी बोली भाषेतील गीते या पाड्यांवरची सांस्कृतिक ओळख निर्माण करतात. अर्थात, ही समृद्ध परंपरा अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळते. भारतीय अध्यात्मातल्या पौराणिक व्यक्तिरेखा राम-लक्ष्मण, कृष्ण, सीता, हनुमान या लोकदैवतांना आपल्या बोलीभाषेतील सुरेख गाण्यांमध्ये बसवून रामाचे आणि कृष्णाचे तसेच अनेक देवतांचे आदिवासी लोकसंस्कृतीत मानुषीकरण केलेले दिसते.

राम-लक्ष्मण आणि सीतेचा वनवास या सर्व गोष्टी आदिवासींच्या लोकगीतातून नेहमीच पुढे आल्या आहेत. निवृत्तिनाथांचीही भजने आदिवासी लोक मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यात सहभागी होऊन गात असतात. ज्याप्रमाणे वारकरी सांप्रदायिक भजनी चाली आहेत, त्याप्रमाणे आदिवासी बांधव त्यांच्या चालीरीतीप्रमाणे निवृत्तिनाथांच्या वारीमध्ये ठेक्यावर चाल धरत निवृत्तीनाथांचे अभंग ज्ञानदेवांचा हरिपाठ म्हणत म्हणत पंढरपूरला जात असतात. (latest marathi news)

Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार! त्र्यंबकेश्‍वराचे घेणार दर्शन

त्यांच्या भक्तिभावामध्ये असणारा साधेपणा हा निश्चितपणानं वारी सोहळ्याचे लक्ष वेधून घेणारा ठरत असतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल तसेच पेठ तालुक्यातील अनेक लोक निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात आपला सहभाग नोंदवत असतात. आदिवासी लोकसंस्कृतीचे हे समृद्ध असं वेगळेपण निश्चितपणाने वारकरी संप्रदायातही भर घालणारे असेच आहे.

"संत निवृत्तिनाथांच्या पौष व आषाढ वारीत आदिवासी भागातील विविध पाड्यांमधील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. संतश्रेष्ठांच्या सप्तशतकोत्तरी जन्ममहोत्सवानिमित्ताने अनेक वारकरी हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतून येतात. हे लोक पालखी सोहळ्याचे खऱ्या अर्थाने वैभव आहे." - नीलेश गाढवे पाटील, माजी अध्यक्ष, संत निवृत्तिनाथ महाराज समाधी ट्रस्ट, त्र्यंबकेश्‍वर

Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Maharaj : यंदाची आषाढीवारी निर्मलवारी करण्याचा संकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com