Nashik Green Chilli Demand: द्राक्षपंढरीतील मिरचीचा आखाती देशात ठसका!दररोज होते शंभर टन निर्यात; मजुरांना रोजगार

Latest Nashik News : गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरातून आखाती देशांत हिरव्या मिरचीला मागणी वाढली आहे.
Laborers packing chillies for shipment to Gulf countries.
Laborers packing chillies for shipment to Gulf countries.esakal
Updated on

कोकणगाव : द्राक्ष, कांदा आणि इतर भाजीपाल्यासोबतच आता द्राक्ष पंढरीतून आखाती देशात मिरचीची निर्यात होऊ लागली आहे. दररोज ८० ते १०० टन मिरची निर्यात होत असल्याने मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. (green chillies demand Hundreds of tons exported to gulf countries)

गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरातून आखाती देशांत हिरव्या मिरचीला मागणी वाढली आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांद्यासह डाळिंब निर्यातीसाठी ओळख बनलेल्या पिंपळगावातून आता हिरव्या मिरचीची निर्यात होऊ लागली आहे.

निर्यातीसाठी ‘जी फोर गौरी’ या वाणाच्या मिरचीला मोठी मागणी आहे. प्रामुख्याने आखाती देशात मिरची पाठविण्यात येते. मिरचीचे देठ हे लवकर सुकत नाही व टिकायला देखील मजबूत असते. त्यामुळे निर्यात करताना नुकसान टळते. रोजच्‍या आहारात मिरची अत्‍यावश्‍यक असल्याने वर्षभर मागणी असते.

किती टन निर्यात?

कोकणगाव, साकोरे मिग, पिंपळगाव बसवंत येथून दररोज ८० ते १०० टन मिरचीची निर्यात होते. एका कंटेनरमधून १४ टन मिरची पाठवली जाते. परिसरातील व्यापारी दररोज ६ ते ७ कंटेनर मुंबईला लोडिंगसाठी पाठवतात.

कोणत्या देशात निर्यात?

पिंपळगाव बसवंत परिसरातून सर्वात जास्त मिरचीची निर्यात दुबईला केली जाते. तेथून कतार, सौदी या देशात माल पाठवला जातो. (latest marathi news)

Laborers packing chillies for shipment to Gulf countries.
Phaltan Vidhan Sabha : फलटण मतदारसंघातला उमेदवार ठरला; अजित पवार यांनी केली 'या' नावाची घोषणा

कोणत्या देशात काय दर?

दुबईला सर्वाधिक मागणी असल्याने व्यापारीवर्गाला चांगला दर मिळतो. शेतकऱ्‍यांकडून मिरची चाळीस ते ४५ रुपये किलो दराने जागेवर खरेदी केली जाते. तर व्यापारी ८० ते ९० रुपये किलो दराने दुबईला पाठवतात.

मिरची कुठून येते?

हिरवी मिरची जाफ्राबाद, नंदुरबार, नागपूर, गुजरात, मध्यप्रदेश या भागातून येते. कारण, तेथे माल स्टोअर होत नाही. तिकडे कंटेनर भाडे जास्त प्रमाणात आकारले जाते. त्यामुळे तेथून माल बोलवून मालाची निवड केली जाते. परिणामी, माल लवकर बंदरात जातो. कोकणगाव ते मुंबई प्रती कंटेनरभाडे चाळीस हजार, तर मुंबई ते दुबई अडिच लाख ते दोन लाख ८० हजार रुपये लागते. विशेष म्हणजे द्राक्षापेक्षा अधिक निर्यात मिरचीची होत आहे.

Laborers packing chillies for shipment to Gulf countries.
Pimplegaon Baswant MSRTC Depot : श्रीमंत आगार, समस्यांनी बेजार! पिंपळगाव बसवंत आगार समस्यांच्या फेऱ्यात; बसेस बनल्या खिळखिळ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()