Nashik: गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला जिल्हा प्रशासनाडून केराची टोपली! अनेक ग्रामपंचायतींचे महा ऑनलाईन ID इतरत्र सुरु

Nashik News : सदर बाब ग्रामसेवकांना माहिती असूनही शासनाचा आयडी व पासवर्ड कसा वापरू देत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
Mahaonline
Mahaonlineesakal
Updated on

घोटी : ग्रामपंचायतींमधील आपले सरकार केंद्रातील आयडी इतरत्र वापरणाऱ्या २५ ऑपरेटरांवर कारवाई करण्याच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला जिल्हा प्रशासनाकडून केराची टोपली दाखविल्याने अधिकृत केंद्रचालक हैराण झाले आहेत. सदर बाब ग्रामसेवकांना माहिती असूनही शासनाचा आयडी व पासवर्ड कसा वापरू देत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (Nashik Group Development Officer case letter neglected from district administration news)

इगतपुरी तालुक्यात नागरिकांना स्थानिक ठिकाणी महाऑनलाईन सेवा मिळण्याच्या दृष्टीने कॉमन सर्व्हिस सेंटर (आपले सरकार केंद्र) ई-गव्हर्नसअंतर्गत ग्रामपालिका स्तरावर नेमलेल्या ऑपरेटरांनी कामकाज सोडून अनेक गावांमध्ये आपले बस्तान बसवल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

त्याचबरोबर इतरांच्या केंद्राचा आयडी वापरून बोगस पद्धतीने शासनाचा कोणताही आदेश नसताना स्थानिक ठिकाणी केंद्र सुरु न ठेवत अनधिकृतपणे केंद्रे सुरु केली आहेत. त्यामुळे अधिकृत केंद्रांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी व शासनाचा आयडी स्वत:च्या हितासाठी इतरत्र वापर केल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील बेकायदेशीरपणे २५ केंद्र सुरु असलेल्या अनधिकृत केंद्र चालकांवर तातडीने कार्यवाही करत महा ऑनलाईन आयडी बंद करण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे (प्रशासन) केली आहे.  (latest marathi news)

Mahaonline
Nashik Lok Sabha Election 2024: हिरकणी कक्ष, पाळणाघराची 320 केंद्रावर सोय! लोकसभेसाठी 200 अंगणवाडी सेविकांची नेमणूक

अनेक महिन्यांपासून गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेतलेली नाही. २०२११ मध्ये सुरु करण्यात आलेल्या केंद्रांवरील दरवाढ अजूनही करण्यात आलेली नसताना अधिकृत केंद्रचालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

"काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनास याबाबत लेखी कळवले आहे. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांच्या बैठकीत याबाबत अहवाल घेतला जाईल. ज्या ग्रामपालिका ग्रामसेवकांबाबत अनभिज्ञ आहे किंवा माहिती असूनही महाऑनलाईन आयडी दुसरे ऑपरेटर वापरत आहे त्या ग्रामसेवकांवर देखील कार्यवाही करण्यात येणार आहे."

- प्रशांत पवार, गटविकास अधिकारी, इगतपुरी

Mahaonline
Ram Navami 2024 : चांदोरीत उद्या बारा बलुतेदारांच्या श्रीरामाचा जन्म! चारशेहुन अधिक वर्षांची परंपरा; भाविकांमध्ये उत्साह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.