Nashik News : मालेगाव सामान्य रुग्णालय होणार 300 खाटांचे : पालकमंत्री दादा भुसे

Nashik News : मालेगाव येथील सामान्य रुग्णालय आता तीनशे खाटांचे होणार आहे. सध्या रुग्णालय २०० खाटांचे आहे.
hospital beds
hospital bedsesakal
Updated on

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालय आता तीनशे खाटांचे होणार आहे. सध्या रुग्णालय २०० खाटांचे आहे. सामान्य रुग्णालय ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामासाठी ७५ कोटी ९९ लाख ५१ हजार रकमेच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (Guardian Minister Dada Bhuse statement Malegaon General Hospital will have 300 beds)

तसेच, दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालय ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धीत मुख्य इमारत व निवासस्थान व ट्रामा केअर युनिट इमारत बांधकामासाठी ५८ कोटी ९८ लाख ४० हजार रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मिळाली असून, दोन्ही कामासाठी शासनाने निधी वितरीत केल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

सामान्य रुग्णालय ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये इमारतीच्या बांधकामासह रेन वाटर हार्वेस्टिंग, फर्निचर, विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, पार्कीग.

अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व गेट, भु-विकास, वातानुकुलीत यंत्रणा सी.सी.टी.व्ही. आदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, पावसाळी अधिवेशनात निधी मंजूर करून वितरीत केला आहे. (latest marathi news)

hospital beds
Nashik Monsoon Update : जिल्ह्यात सरासरी 13 मिलिमीटर पाऊस!

दाभाडी ग्रामीण रुग्णालय ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धीत मुख्य इमारत व निवासस्थान, दाभाडी येथे ट्रामा केअर युनिट इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. अंदाजपत्रकामध्ये इमारतीच्या बांधकामासह रेन वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, पार्कीग, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व गेट, भु-विकास, वातानुकुलीत यंत्रणा सी.सी.टी.व्ही.

आदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधी वितरीत केला आहे. या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सुखकर होणार असून, रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

hospital beds
Nashik ZP News : पदभरतीच्या प्रारूप निवडयाद्या संकेतस्थळावर; पुढील आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.